Rahul Gandhi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यंदाच्या आषाढी वारीत (Ashadhi Vari) सहभागी होणार आहेत. ते ७ जुलै रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभाही होणार आहेत. अशातच आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील या वारीत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे प्लॅनिंग असल्याचे सांगितल्या जात आहे.
Video : ओम बिर्लांना शुभेच्छा देताना तटकरेंनी गाजवली लोकसभा; शाहंसह राजनाथही ऐकत राहिले
भारत जोडो यात्रा, भारत जोडो न्याय यात्रा या माध्यमातून राहुल गांधींनी देशभर दौरा केला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातही अनेक सभाही घेतल्या. त्यानंतर आता राहुल गांधी पंढरीच्या वारीत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आषाढी वारीला येणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 13 जागा जिंकल्या असून आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर राहुल गांधींनी वारीत सहभाग घेतला तर त्याचा फायदा काँग्रेसला निवडणुकीत होऊ शकतो.
Big News ! मराठवाड्यात खुलं झालं रोजगाराचं द्वार; फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी बातमी
‘या’ दिवशी होणार वारीत सहभागी
दरम्यान, पंढरीच्या वारीत महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. दरवर्षी बारा लाखांहून अधिक भाविक आषाढी वारीत सामील होतात. सुमारे महिनाभरापासून महाराष्ट्रातील गावखेड्यातील नागरीक आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या वारीत आता राहुल गांधी सामील होणार आहेत. ते 13 किंवा 14 जुलै रोजी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत.
यानंतर आषाढी वारीतही त्यांनी सहभागी व्हावं यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे माळशिरस ते वेळापूर या दरम्यान, राहुल गांधी प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊ शकतात.