Rahul Gandhi Sabha in Mumbai : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांची मुंबईतील बीकेसीमध्ये येत्या 20 ऑगस्ट रोजी सभा होणार आहे. मात्र, या सभेला मुंबई वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. हा आक्षेप मुंबई वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएकडे पाठवला आहे. मुंबई पोलिसांच्या या भूमिकेमुळे आत काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.
आता 70 वर्षांपुढील सर्वांचे आयुष्यमान योजनेंतर्गत मोफत उपचार; राष्ट्रपती मुर्मू यांनी केली घोषणा
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे राहुल गांधी यांची एक सभा होणार आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएला सांगितलं आहे की, सायन रेल्वे स्थानकावरील रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) बंद झाल्यामुळे (नवीन पूल बांधण्यासाठी हा पूल पाडला जात आहे) संपूर्ण वाहतूक बीकेसीमधून जात असून बीकेसीमध्ये वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेचा या वाहतूक कोंडीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
बीकेसी परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामामुळे पूर्वीपेक्षा रस्त्याची रंदी कमी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या सभेला किमान 20 हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सायन आरओबी बंद झाल्यापासून बीकेसीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची सभा किंवा रॅली आयोजित करण्यात आलेली नाही, असं मुंबई वाहतूक पोलिसांचं मत आहे.
SEBI: ..मग अध्यक्षांनी राजीनामा का दिला नाही?, राहुल गांधींची सेबीच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती
काँग्रेस काय भूमिका घेणार?
राहुल गांधी यांच्या या सभेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसकडून तयारी केली जात आहे. मात्र ऐनवेळी मुंबई वाहतूक पोलिसांनी खोडा घातल्यामुळे काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या या भूमिकेमुळे आता राहुल गांधींची बीकेसीत सभा होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.