Rahul Gandhi : काँग्रेसला बसणार धक्का, 99 खासदार होणार अपात्र? याचिका दाखल

Rahul Gandhi : काँग्रेसला बसणार धक्का, 99 खासदार होणार अपात्र? याचिका दाखल

Rahul Gandhi : काँग्रेस पक्षाच्या 99 खासदारांना अपात्र ठरवण्यात यावा या मागणीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात (Allahabad High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मतदारांची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून सामाजिक कार्यकर्त्या भारती सिंह (Bharti Singh) यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

या याचिकेत कॉग्रेसचे (Congress) निवडणूक चिन्ह जप्त करण्यात यावे आणि 99 खासदारांना अपात्र ठरवण्यात यावे तसेच काँग्रेस पक्षाची नोंदणी रद्द करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत भारती सिंह यांनी केली आहे.

त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने गरीब, मागास, दलित आणि अल्पसंख्याकांना दरमहा 8500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. अनेक जाहीर सभेत राहुल गांधी यांनी याबाबत आश्वासन देखील दिले होते. काँग्रेसने निवडणुकीत मतांच्या बदल्यात लोकांना पैसे देण्याचे आमिष दाखवले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या स्वाक्षरी असलेल्या या वचननाम्यावर मतदारांना मतदानाच्या बदल्यात पैसे मिळतील, असे आश्वासन देण्यात आले असं त्यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 121(1)(ए) चे उल्लंघन केल्याचा आरोप देखील देखील भारती सिंह यांनी या याचिकेत केले आहे. भारतीय दंड संहितेनुसार हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षावर कारवाई करण्यात यावेळी असं देखील भारती सिंह यांनी या याचिकेत म्हटले आहे.

काँग्रेस पक्षावर कारवाई करण्यात यावी यासाठी भारती सिंह यांनी निवडणूक आयोगाला देखील पत्र लिहिले होते मात्र निवडणूक आयोगाकडून कोणतीही ना झाल्याने भारती सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. माहितीनुसार, भारती सिंह यांच्या या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार असल्याची शक्यता आहे.

धक्कादायक, गुजरातमधील शिक्षिका 8 वर्षांपासून अमेरिकेत करते मौज अन् दरमहा खात्यात जमा होतो सरकारी पगार

नेमकं प्रकरण काय?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 3 एप्रिल रोजी दिल्लीत महालक्ष्मी योजना लागू करण्याबाबत भाष्य केले होते. या योजनेत दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल श्रेणी) कुटुंबातील महिला प्रमुखाच्या खात्यात दरमहा 8,500 रुपये थेट जमा होणार असा आश्वासन त्यांनी दिले होते. तसेच राहुल गांधी यांनी देखील एका जाहीर सभेत बोलताना दर महिन्याला तुमच्या खात्यात 8,500 रुपये जमा होतील असं म्हटले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube