Download App

‘माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास’…; नार्वेकरांनी दिला इशारा

Rahul Narwekar On Shinde Group :  विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सत्तासंघर्षाच्या निकालावर आता भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्षांनी जर चुकीचा निर्णय दिला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ असे म्हटले होते. या सगळ्यांवर आता राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले आहे.

या सगळ्या प्रकरणावर किती वेळ लागेल हे मी आत्ता सांगू शकत नाही. माझ्याकडे सध्या भरपूर याचिका प्रलंबित आहे. कायद्याच्या आधावर प्रत्येक याचिकेवर निर्णय द्यावा लागेल. आम्हाला  निर्णय द्यायला ना घाई करायची आहे ना उशीर करायचा आहे. आम्ही कोणत्याही प्रकराची घाईगडबड करुन न्याय देणार नाही. त्यामुळे आम्ही नियमांच्या आधारावर व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन निर्णय देणार आहोत, असे नार्वेकर म्हणाल आहेत.

मोठी बातमी! शाहरुखच्या मुलाला तुरुंगात टाकणाऱ्या समीर वानखेडेंवर सीबीआयची छापेमारी; गुन्हा दाखल

तसेच यावेळी त्यांना तुमच्यावर दबाव आहे का असा प्रश्न देखील विचारण्यात आला. यावर देखील त्यांनी स्पष्ट भाष्य केले आहे. विधानभवनाच्या बाहेर कोणताही व्यक्ती काहीही बोलू दे. कितीही प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करु दे. आम्ही त्यांच्या दबावाला बळी पडणार नाही. जे कायद्याच्या अनुसार उचित आहे, तो निर्णय आम्ही घेऊ असे ते म्हणाले आहेत. कोणत्याही व्यक्तीच्या इच्छेनुसार आम्ही निर्णय घेणार नाही. कायद्याच्या आधारे आम्ही निर्णय घेणार आहोत. जर कोणी नेता म्हणत असेल की 15 दिवसांमध्ये निर्णय घ्या, तर निर्णय हा 15 दिवसांमध्येही होऊ शकतो किंवा त्यापेक्षा अधिक काळही लागू शकतो, असे ते म्हणाले आहे.

CAT ने निलंबन रद्द केलंय, परमबीर सिंग यांच्या निलंबनावर फडणवीस म्हणाले…

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा काल शिंदे विरुद्ध ठाकरे या सत्तासंघर्षावर निकाल आला आहे. यामध्ये न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. परंतु हा निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने वेळेची मर्यादा दिलेली नाही. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांमध्ये अध्यक्षांनी निर्णय न घेतल्यास न्यायालयात जाणार असे म्हटले आहे.

Tags

follow us