Rahuri Assembly by-election! Will Akshay Kardile get a chance or will Tanpure make a move : 2024 ची विधानसभा निवडणूक रंगतदार झाली, राहुरी मतदार संघामध्ये माजी राज्यमंत्री राहिलेले प्राजक्त तनपुरे यांच्या विरुद्ध भाजपचे शिवाजीराव कर्डीले अशी निवडणूक पार पडली. केलेली काम यामुळे आपला विजय नक्की असा अंदाज बांधणारे तनपुरे हे काहीसे गाफील राहिले व कर्डीले यांनी जोरदार आघाडी घेत निवडणुकीत गुलाल उधळवला. कर्डीले आमदार झाले मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले. आता राहुरीमध्ये पोटनिवडणूक होणार असे बोलले जात आहे. शिवाजीराव यांचे वारसदार अक्षय कर्डीले यांच्या नावाची चर्चा आता जोर धरू लागली आहे, अक्षय यांना विखे व जगताप यांची साथ लाभत आहे. तर दुसरीकडे तनपुरे देखील निवडणुकीच्या अनुषंगाने पाऊले टाकत आहे. यामुळे आता राहुरी मतदार संघामध्ये नेमकं काय होणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
कर्डीले यांच्या निधनानंतर आता राहुरी मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याच्या मार्गावर असून, पुढील काही महिन्यांत उमेदवारांचे नाव, प्रचाराचे स्वरूप आणि राजकीय पक्षांचे डावपेच यावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित होणार आहे. शिवाजीराव कर्डिले यांचे राजकीय वारसदार चिरंजीव अक्षय कर्डिले की,पत्नी अलकाताई कर्डिले? यावरही चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. तर 2024 च्या निडवणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेत पुन्हा एकदा आमदारकीला गवसणी घालण्यासाठी तनपुरे गट देखील सज्ज झाला असल्याचे चित्र मतदार संघात दिसतेय.
एसटीला दिवाळीतच ‘अंधार’ तिकीट महसुलात सरासरी 6 कोटींची दैनंदिन तूट
राहुरी तालुक्यातील जनतेला आता नव्या आमदाराच्या रूपात आपला प्रतिनिधी निवडण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. सध्याच्या परिस्थिनुसार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि युवा नेते अक्षय कर्डीले यांची लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ही निवडणूक केवळ मतदारसंघापुरती मर्यादित न राहता, राज्याच्या राजकारणावरही प्रभाव टाकणारी ठरण्याची शक्यता आहे. यातच कर्डीले यांच्यासाठी आता खुद्द विखे व जगताप हे मैदानात उतरले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विखे यांनी मेळावे घेत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. व अक्षय यांना पाठबळ द्यावे त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे म्हणत एकप्रकारे अक्षय यांच्या निवडणुकीसाठीची तयारी सुरु केल्याचे देखील बोलले जात आहे.
विखे जगतापांची भूमिका महत्वाची
शिवाजीराव कर्डीले यांची राहुरीसह नगर तालुक्यावर एक चांगली पकड राहिली. कर्डीले यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने काही दिवसांपूर्वी अक्षय हे स्वतः मतदार संघातील लोकांचा भेटी गाठी घेत होते. मात्र अचानक शिवाजीराव यांचे निधन झाल्याने हि जबाबदारी अक्षय यांच्या खांद्यावर आली. आता अक्षय कर्डीले यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कर्डीले समर्थकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान राहुरीचे रिमोट कंट्रोल हे विखे यांनी हाती घेतले आहे. जगतापांच्या साथीने काय निर्णय घेतला जावा याबाबत चाचपणी सूर आहे. तसेच येणाऱ्या काळात होणाऱ्या या निवडणुकीबाबत वरिष्ठ अक्षयला संधी देणार कि नवीन उमेदवार देणार हे पाहणे देखील महतवाचे आहे.
तनपुरे विरुद्ध कर्डीले लढत झाली तर?
दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांचा जनसंपर्क हा मोठा होता. राजकारणातील डावपेचमध्ये ते चांगलेच हुशार होते. त्यानं मानणारा मोठा वर्ग आहे मात्र त्यांच्यानंतर जर अक्षय कर्डीले यांना संधी दिली तर त्यांचे नेतृत्व जनता स्वीकारणारा का? तसेच त्यांच्या विरोधात जर तनपुरे हे उभे राहिले तर तनपुरे यांच्याकडे असलेला राजकारणाचा दांडगा अनुभवापुढे अक्षय हे टिकणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. मात्र सध्याची परिस्थिती पाहता अक्षय यांच्यासाठी येणाऱ्या काळात राजकारणामध्ये
