Download App

Rain Alert : आजही मुसळ’धार’! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Rain Alert : सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका (Rain Alert) राज्याला बसत आहे. राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. राज्यात मागील तीन चार दिवसांपासून पाऊस होत आहे. आजही पावसाचा जोर कायम (Weather Update) राहण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून (बुधवार) पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात मागील तीन दिवसांविदर्भातील सर्व जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच जळगाव, नाशिक, पालघर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पासून जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. या अवेळी झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काल रात्रीही नगर शहरात जोरदार पाऊस झाला. आज सकाळी दाट धुके पसरले होते. समोरचेही काही दिसत नव्हते. या बदललेल्या हवामानामुळे गारठा मात्र कमी झाला आहे.

Rain Alert : सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांत होणार गारपीट; हवामान विभागाचा अंदाज काय?


नगर-पुण्यात आज पावसाचा अंदाज 

मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड तसेच विदर्भातील अकोला, अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरात काल ढगाळ हवामान होते. आजही हवामानात फारसा बदल होणार नाही. मात्र आज हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे शहरात गुरुवानंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 5 ऑक्टोरनंतर राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. ढगाळ वातावरण काही दिवस कायम होते. पण, पाऊस पडला नाही. ऑक्टोबर महिन्यात सर्वत्रच कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कोकणातील काही भागांना ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानंतर आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात तर पावसाला सुरुवातही झाली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जर अन्य जिल्ह्यात पाऊस झाला तर या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

Rain Alert : चार दिवस मुसळधार! राज्यातील ‘या’ 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट

अवकाळी पाऊस का होतोय ?

नैऋत्य अरबी समुद्रापासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याच वेळी कमी दाबाच्या हवेचा पट्टा सक्रिय झाला असल्याने पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे.

Tags

follow us