अवकाळीचा तडाखा… पालकमंत्री विखे यांनी दिल्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना

अवकाळीचा  तडाखा… पालकमंत्री विखे यांनी दिल्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना

Radhakrishna Vikhe Patil : नगर शहरासह (Ahmadnagar news) जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले. गारपीट आणि अवकाळी पावसाने शेती पिक, फळ बागा आणि दगावलेल्या जनावारांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रशासनाला दिले.

नगर शहरासह रविवारी पारनेर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच पारनेरमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट देखील झाली. गारपिटीमुळे शेतात उभी असलेली पिके जमीनदोस्त झाली. अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी प्रशासन देखील आता सर्वसावले आहे. नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी याबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

‘जायकवाडीला पाणी सोडलं, पण मुळा-प्रवरा..,’; आमदार गडाखांनी केली ‘ही’ मागणी

जिल्ह्यात अवकाळी पाऊस तसेच गारपीटीने झालेल्या नूकसानीची माहीती पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रशासनाकडून जाणून घेतली. या नूकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना मंत्री विखे यांनी महसूल आणि कृषी विभागानना दिल्या आहेत. आणखीनही काही दिवस पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांनी व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

तसेच पुढे बोलताना मंत्री विखे म्हणाले, ग्रामीण भागात काही नागरीकांच्या घरांचे किंवा जनावारांच्या गोठ्याचे नूकसान झाले असल्यास तातडीच्या उपाय योजना तसेच मदत करण्याबाबत प्रशासनास सांगितले असून या नैसर्गिक संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

नगरकरांनो सावधान! पुढील तीन-चार तासांत पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

गारपीट आणि अवकाळी पावसाने झालेल्या नूकसानीचा निश्चित आकडा समोर येण्यास अवधी लागेल.परंतू महसूल विभागाकडे प्राप्त झालेल्या प्राथमिक माहीतीनूसार पारनेर तालुक्यात १०० जनावरे जखमी आणि चार घरांची पडझड झाली असून,संगमनेर तालुक्यात ४ मेंढ्या मयत झाल्या असून १० घरांची पडझड झाली आहे. राहुरी तालुक्यात १२ कोकरू ६ मेंढ्या व १ शेळी मयत झाली ७ घरांची पडझड झाली असून, अकोले कोपरगाव श्रीरामपूर या तालुक्यातही घरांची पडझड व जनावरे दगावल्याची प्राथमिक माहीती समोर आली असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

बांधावर जाण्याची स्टंटबाजी करण्यापेक्षा आमदार लंकेंनी सरकारच्या दारात जाऊन बसावं… झावरेंचा खोचक टोला

गारपीट आणि अवकाळी पावसाने नूकसान झालेल्या परीस्थीतीची पाहाणी करण्यासाठी अधिकऱ्या समवेत पाहाणी दौरा करणार असून सद्य परीस्थीतीत स्थानिक अधिकाऱ्यांनी नूकसान झालेल्या ठिकाणाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube