Download App

Maharashtra Rain : राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून (Monsoon) उशिरा दाखल झाला असला, तरी अल्पावधीतच पावसाने सरासरी गाठली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणात रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला होता. त्यानंतर आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. त्यामध्ये 14 ते 17 जुलैदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ( Rain alert in Maharashtra from IMD )

Weather Update : पुराचे पाणी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरापर्यंत, यमुना नदी धोक्याच्या पातळीवर

त्यामुळे आज देखील राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. तर काही भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासानाकडून करण्यात येत आहे.

Horoscope Today: ‘कन्या’ राशीचे भाग्य उजळणार! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

यंदा राज्यात मान्सूनचं आगमनं उशीरानं झालं. त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला. विदर्भासह राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना दुबार पेरण्याची वेळ आली आहे. या आठवड्यात मुंबईत फारसा पाऊस न पडल्याने उकाड्याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र ही उष्णता जास्त नसेल, असा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र, आता हवामान खात्याने नाशिक, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना यासह विर्भातील बुलढाणा, वाशीम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर आणि अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली. हवामान विभागाने यादरम्यान वादळी वारेही वाहतील असं सांगितलं.

Tags

follow us