Weather Update : यमुना नदी धोक्याच्या पातळीवर, पुराचे पाणी थेट मुख्यमंत्री केजरीवालांच्या घरापर्यंत

  • Written By: Published:
Weather Update : यमुना नदी धोक्याच्या पातळीवर, पुराचे पाणी थेट मुख्यमंत्री केजरीवालांच्या घरापर्यंत

Weather Update : उत्तर भारतासह डोंगराळ राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये पावसाने कहर. दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरापर्यंत पुराचे पाणी आले आहे. यमुना नदी धोक्याच्या पातळीच्यावर 3 मीटरने वाहत आहे. संपूर्ण दिल्लीमधील हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (Flood water up to Chief Minister Kejriwal’s house, Yamuna river at danger level)

13 जुलैच्या सकाळी यमुनेने नवा विक्रम केला. सकाळी सात वाजता नदीच्या पाण्याची पातळी 208.46 मीटर नोंदवली गेली. यमुनेने बुधवारी 207.49 मीटरची सर्वोच्च पातळी ओलांडली होती. काल रात्री यमुना नदीने 208 मीटरचा पल्ला ओलांडला होता.

यमुनाकटच्या परिसरात रात्री उशिरा घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. घाईघाईत लोक आपापल्या जीवनावश्यक वस्तू बाहेर काढून रस्त्यावर आले. रस्त्यावर शेकडो कुटुंबांना मुलांसह राहावे लागत आहे.

वळसेंना मतदारसंघात जाऊन उत्तर देणार; आमदार रोहित पवार आक्रमक

अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी अनेक राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. IMD ने हिमाचल, उत्तराखंड, उत्तराखंड, बिहार आणि दिल्लीसाठी पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर सरकारने आपल्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

उत्तर भारतात पावसाने कहर 

उत्तर भारतात मान्सूनच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये कुठेतरी पूल कोसळत आहेत, तर कुठे भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. मुसळधार पावसामुळे उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांपासून उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube