Rain Alert : राज्यात आता थंडीचं आगमन होत असून वातावरणात गारठा (Rain Alert) वाढू लागला आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला आहे. दिवाळीचा सणही (Diwali 2023) अगदी तोंडावर आला आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पावसाचं (Rain Alert) संकट घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बुधवारी काही जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या दिवसांत पाऊस होत नाही. पिके काढणीची कामे वेगात सुरू असतात नेमक्या त्याचवेळी अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. आताही हवामान विभागाने आणखी चार दिवस राज्यात अवकाळीचं संकट कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे. पुढील चार दिवसांत मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Politics : ठाकरे गटाला धक्का! पक्ष अन् चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर
गुरुवारी रात्री मुंबईत मुसळधार पाऊशस झाला त्यामुळे शहरातील प्रदूषण काही प्रमाणात कमी झाले. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापुरातही जोरदार पाऊस झाला. कल्याणमध्ये झाडे कोसळून पडली. काही ठिकाणी वीज पुरववठाही खंडित झाला होता.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि आणखी काही भागात तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागात आज ढगाळ हवामान राहिल. काही ठिकाणी पाऊस होईल अशी शक्यता आहे. हवामान विभागाने आज मुंबईत यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासात पुणे, सातारा, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
Maratha Reservation : आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत