राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याची गरज, कुठं होणार पाऊस?

राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय होऊ शकतो असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला असून येत्या काही दिवसांता विदर्भ आणि मराठवाड्यात होऊ शकतो.

राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याची गरज, कुठं होणार पाऊस?

News Photo 2024 09 20T072605.236

Rain Update in Maharashtra : पावसाचे वातावरण पुन्हा सक्रिय होत असून महाराष्ट्रात (Rain Update ) पुढील काही दिवस मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल पुणे शहरातील काही भागांमध्ये सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाचा अनुभव आला. परतीचा पाऊस अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभाग आणि प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

महायुतीमध्ये 80 टक्के जागा वाटप फायनल ! भाजप 160हून अधिक जागांवरच लढणार ?

पुणे शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. यावर्षी पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरवस्थेने महानगरपालिकेवर मोठं आव्हान उभं केलं आहे. पावसाळ्यानंतर उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करणं आवश्यक आहे, अन्यथा वाहतुकीस अडथळे निर्माण होतील. परतीच्या पावसामुळे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळासह पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत पुढील 24 तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, हलक्या पावसाची शक्यता आहे. शहरातील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस असणार आहे. पुण्यातही ढगाळ आकाशासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, आणि तापमान 32 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. किमान तापमान 20 अंश सेल्सिअस असेल.

नागपूर मराठवाड्यातील स्थिती

नागपूरमध्ये ढगाळ आकाशासह हलका पाऊस होईल. तर, तापमान 32 अंश सेल्सिअस असेल. नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारनंतर ढगाळ आकाश होण्याची शक्यता आहे, आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Sahitya Sammelan : दिल्लीत होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरेंकडून निवड

शेतकऱ्यांसाठी गंभीर धोका

राज्यात 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सलग 11 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हा पाऊस झाला, तर मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. यापूर्वीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

Exit mobile version