Sahitya Sammelan : दिल्लीत होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरेंकडून निवड

  • Written By: Published:
Sahitya Sammelan : दिल्लीत होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरेंकडून निवड

पुणे : सरहद (Sarhad) पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आगामी दिल्ली येथे होणार्‍या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) राष्ट्रीय पातळीची बोधचिन्ह निवड स्पर्धा नुकतीच पार पडली.

बच्चू कडूंचा अखेर महायुतीला रामराम; संभाजीराजे, शेट्टींसोबत तिसरी आघाडी स्थापन 

या स्पर्धेत 100 हून अधिक नामांकित स्पर्धकांकडून उल्लेखनीय अशी बोधचिन्हे तयार करण्यात आली होती. यापैकी संमेलनासाठीचे बोधचिन्ह निवडण्याची महत्त्वाची जबाबदारी सरहदकडून प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकर (Raj Thackeray) यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मिळालेल्या बोधचिन्हापैकी मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हीटी अँड आर्टचे प्रसाद गवळी (लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे) यांच्या बोधचिन्हाची अंतिम निवड करण्यात आली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?
महाराष्ट्राची अस्मिता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजमुद्रा आणि साहित्याची पारंपारिक लेखणी बोधचिन्हात स्पष्ट दिसत आहे. तसेच सदरचे बोधचिन्ह सरळ आणि साधे असल्यामुळे निवडण्यात आले आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

IND VS Bangladesh : पहिल्याच दिवशी अश्विनची बॅट तळपली; शतकी खेळीचा टप्पा गाठला 

दरम्यान, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रसाद गवळी यांचा विशेष सन्मान दिल्लीमधील साहित्य संमेलनात केला जाईल, अशी माहिती सरहदचे संस्थापक, अध्यक्ष संजय नहार यांनी दिली.

दिल्लीत 70 वर्षानंतर संमेलन
दरम्यान, हे संमेलन पुढील वर्षी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात करण्याचा प्रस्ताव आहे. यापूर्वी 1954 मध्ये दिल्लीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे आता तब्बल सत्तर वर्षांनी पुन्हा एकदा दिल्लीत मराठी भाषा डंका वाजणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube