Raj Thackeray On Uddhav Thackeray Bag Check : माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना विमानतळावर बॅगची तपासणी करण्यात आली. (Raj Thackeray) दोन दिवसांपूर्वी वणी येथेही असाच प्रकार झाला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडीओ करत कर्मचाऱ्यांची उलट तपासणी केली. तो व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर टाकला आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होती. या सभेतही बॅग तपासणीवर त्यांनी जोरदार टीका केली. माझ्या बॅग तपासा…पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बॅग का तपासत नाहीत? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत विचारला. उद्धव ठाकरेंच्या या बॅग तपासणीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील भाष्य केलं आहे. भांडूपच्या जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते.
Video : मोदींची बॅग तपासतानाचा व्हिडिओ मला आला पाहिजे; वणीत झाडाझडती होताच ठाकरेंचा संताप
उद्धव ठाकरेंची आज निवडणूक आयोगाच्या लोकांनी बॅग तपासली. परवा पण असंच झालं होतं. निवडणूक कर्मचाऱ्यांना कळत नाही त्यात काय भेटणार. ज्यांच्या हातातून कधी पैसे निघाले नाहीत त्यांच्या हातातून आणखीन काय निघणार. फारफार तर रुमाल आणि कोमट पाणी…असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. आमची बॅग तपासली, आमची बॅग तपासली करताय, अरे आमच्यापण बॅग तपासल्या आहेत. अरे येवढा काय तमाशा करताय, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
शिरसाट काय म्हणाले?
निवडणूक आचारसंहिता असते त्यानुसार ,जो अधिकार पथकला असतो, त्यांनी तो वापाराला आहे, घटनेला मानणाऱ्या लोकांनी त्रास करून घेऊ नयेत. तुमच्याकडे काही नाही ना, पाच मिनिटांनी काय आभाळ कोसळणार आहे? आपण काय विशेष आहेत का? उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील बॅग चेक केली पाहिजे असं आमचं म्हणणे आहे. हा विषय छोटा आहे. एक बॅग चेक केली. हा काय विषय आहे का?, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.