Video : मोदींची बॅग तपासतानाचा व्हिडिओ मला आला पाहिजे; वणीत झाडाझडती होताच ठाकरेंचा संताप

Video : मोदींची बॅग तपासतानाचा व्हिडिओ मला आला पाहिजे; वणीत झाडाझडती होताच ठाकरेंचा संताप

Udhav Thackeray News : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असताना सर्वच पक्षांच्या राज्यभरात प्रचारसभा सुरु आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान वणीमध्ये उद्धव ठाकरे यांची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी मला मोदी शाहांचीही बॅग तपासतानाचा व्हिडिओ आला पाहिजे, या कडक शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांसमोरच संताप व्यक्त केलायं. यासंदर्भातील व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलायं.

या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरताच अधिकाऱ्यांनी ठाकरे यांना बॅग तपासण्याबाबतची विनंती अधिकाऱ्यांनी केलीयं. यावेळी ठाकरेंचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या राजकीय नेत्याची बॅग तपासलीयें, माझी बॅग तुम्ही तपासा पण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मोदी अमित शहांची बॅग तपासली का? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केला आहे.

23 तारखेला सांगोल्याच्या गद्दाराला गुवाहाटीला पाठवा, त्याला तिकडचं…; उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रात सभांसाठी येत आहेत. त्यांच्याही सर्वांच्या बॅगा तपासण्याचा व्हिडिओ तुम्हा अधिकाऱ्यांकडून मला हवा आहे. आजचा माझी बॅग तपासण्याचा व्हिडिओ मी शेअर करीत आहे, या शब्दांत उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांवर संतापले आहेत. त्यावर उत्तर देताना अधिकाऱ्यांनीही आम्ही सर्वांच्या बॅगा तपासणार असल्याचं स्पष्ट केलंय.

उद्धव ठाकरेंना धक्का! ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारती कामडींचा जय महाराष्ट्र

उद्धव ठाकरे पोस्टमध्ये काय म्हणाले?
डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात सगळ्यांना समान न्याय हे आम्ही मानतोच, पण यंत्रणांना हाताशी धरुन लोकशाहीला पायदळी तुडवून हुकुमत गाजविणाऱ्या दिल्लीश्वरांनी मात्र त्या संविधानाचा सगळ्याच पातळ्यांवर अवमान करायचा ठरवलं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube