शिंदेसेनेचा कोथळा अमित शाहाच काढणार…ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते पुन्हा मैदानात

एकनाथ शिंदेसेनेचा कोथळा अमित शाहाच बाहेर काढणार असल्याचं मोठं विधान करीत ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केलीयं.

Raut

Sanjay Raut : एकनाथ शिंदेसेनेचा कोथळा अमित शाहाच बाहेर काढणार असल्याचं मोठं विधान करीत ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पुन्हा मैदानात उतरले आहेत. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यानंतर आता सध्या राज्यात चाललेल्या निवडणुकीच्या मुद्द्यावरुन त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागलीयं.

धक्कादायक! बीडमध्ये बनावट आधार काढल्याची तक्रार, निवडणूक अधिकाऱ्यांनी काढलं पत्र

पुढे बोलताना म्हणाले, शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलं आहे १ तारखेला लक्ष्मीदर्शन होणार आहे. आता निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे. काही ठिकाणी १० हजार किंवा १५ हजार एका मतामागे असं लक्ष्मी दर्शन सुरु आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये पैशांचा इतका खेळ कधीही झाला नव्हता.

राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार या निवडणुका लढवतच नव्हते. स्थानिक पातळीवरच या निवडणुका होत होत्या. आता पाच-सहा हेलिकॉप्टर्स, खासगी विमानं हे सगळं पाहण्यास मिळतं आहे. आम्ही निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या आहेत. लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत, तसं मुळीच नाही. या राज्याची निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त झाली आहे. मागच्या चार ते पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्वात संस्कृती उद्ध्वस्त झाली आहे. सध्याच्या घडीला तू मोठा की मी मोठा अशी स्पर्धा तीन सत्ताधारी पक्षांमध्ये चालली असल्याचं राऊत म्हणाले आहेत.

आजच्या उपभोगाचा भार उद्याच्या करदात्यांवर हे गंभीर, माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव काय म्हणाले?

तसेच एकनाथ शिंदेंची शिवसेना असं मी म्हणायला तयार नाही. शिवाय शिंदे सेनेचा कोथळा अमित शाहच काढणार आहेत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी एक प्रेझेंटेशन दाखवलं. त्यांचं जे काही चाललं ते उत्तम चाललं असल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मी आजारी असताना देवेंद्र फडणवीस यांनी माझी चौकशी केली आणि मदतीचं आश्वासन दिलं. नरेंद्र मोदींनी माझी चौकशी केली, मला फोन आला होता. एकनाथ शिंदेंनी फोन केला होता. कारण राजकारणापलिकडे काही नाती जपायची असतात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

December Rules : सीएनजीपासून पेन्शनपर्यंत, 1 डिसेंबरपासून बदलणार पैशाशी संबंधित ‘हे’ नियम; जाणून घ्या सर्वकाही

एक महिन्यापेक्षा जास्त काळ मी कैदखान्यात आहे. घरच्या आणि रुग्णालयाच्या. माननीय उद्धव ठाकरेंचं माझ्यावर बारीक लक्ष आहे मी कुठे बाहेर पडतोय का? याकडे. आत्ताही त्यांची परवानगी नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

follow us