कायद्याची भाषा करत फडणवीसांनी थेट घेतला ECI शी ‘पंगा’; म्हणाले, प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी…
निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे.
CM Devendra Fadnavis On Election Commission : निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट निवडणूक आयोगाशी पंगा घेतला आहे. उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचं आहे. अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग (Election Commission Of India) स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे. याबद्दल रिप्रेझंटेशन आम्ही निवडणुक आयोगाला देऊ असे फडणवीसांनी म्हटले आहे. निवडणूक आयोग कुठला कायदा काढतय, कोणाचा सल्ला घेतय मला माहित नाही. जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी बोललो, अशा पद्धतीने निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून पुढे ढकलता येत नाहीत. ते छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते.
शिवसेना-भाजप संघर्ष पेटला; सांगोल्यात शहाजीबापूंच्या ऑफिसवर छापेमारी…
आयोगाने कायद्याच चुकीचा अर्थ लावला
राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका (Nagarparishad Election 2025) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या आहे. मात्र, दोन आठवड्यापासून जिथं प्रचाराचा धुरळा उडत होता. तिथं अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलं आहे. उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचं आहे. अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय. ते मला माहित नाही, माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही, असेही फडणवीस म्हणाले. अशा पद्धतीने कोणीतरी कोर्टात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलली जाईल असं आजपर्यंत कधी झालं नव्हतं.
पुढे ढकललेल्या निवडणुका केव्हा होणार?
जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झालाय. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथं आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी होणार आहेत. ज्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे गोष्टी केल्या. ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्यांच्यासाठी अशाप्रकारे निवडणुका पुढे ढकलणं अत्यंत चुकीच असून आम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाला एक रिप्रेझेंटेशन देऊ असेही यावेळी फडणवीसांनी स्पष्ट केले.
