Raj Thackeray आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला, युतीच्या चर्चेला उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत निवासस्थानी ही भेट घेणार आहेत. यापूर्वी देखील दोनदा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे आणि शिंदे गट यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप दोन्ही पक्षाकडून युतीबाबत […]

Raj Thackeray 1

Raj Thackeray 1

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत निवासस्थानी ही भेट घेणार आहेत. यापूर्वी देखील दोनदा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे.

आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे आणि शिंदे गट यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप दोन्ही पक्षाकडून युतीबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

मोठी बातमी ! ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतले

आजची भेट कशासाठी ?

आज राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. याचं कारण राज्यातील शेतकरी प्रश्नांवर राज ठाकरे काही मागण्या घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत काही नुकसानग्रस्त शेतकरी देखील असणार आहेत. मागच्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पण या शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही.

राज ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार आहेत, असं सांगितलं जात असलं तरी या भेटीमागे राजकीय कारण असल्याची चर्चा होत आहे. याआधी मशिदीच्या भोंग्यावरून निमित्त राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेची भेट घेतली होती. त्यानंतर काही कार्यक्रमात देखील या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.

आमदार जगतापांची सडेतोड मुलाखत

Exit mobile version