ठाकरे घराण्यातील संघर्ष कायम असल्याचं दर्शन राज ठाकरेंच्या नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान घडलंय. उद्धव ठाकरेंना मी काय सल्ला देणार ते स्वत:च स्वयंभू असल्याचा उपरोधिक टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनाही सल्ला दिला आहे.
भाजप महाराष्ट्राची माती करायला निघालंय, संजय राऊतांचे टीकास्त्र
राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आत्ताच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांनी जपून रहावं, असं मी त्यांना सांगेन तर उद्धव ठाकरे स्वत: स्वयंभू असून त्यांना मी काय सल्ला देणार असल्याचं म्हणत मुलाखतीतही त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं नसल्याचं दिसून आलं आहे.
तसेच यावेळी राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंना काय सांगाल, असंही विचारण्यात आलं तेव्हाही त्यांनी स्वयंभू असल्याचंच म्हंटलं आहे. त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वरिष्ठ पातळीवर चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला दिला असून नीट लक्ष द्यावं, असं आवानही केलं आहे.
Samantha Ruth Prabhu : ब्युटी विथ ब्रेन समंथा गणितात अव्वल; दहावीचं रिपोर्ट कार्ड व्हायरल
यावर बोलताना देवंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिप्रश्न उपस्थित करीत देवेंद्र फडणवीसांना घरी लक्ष देण्याबाबतचाही सल्ला देण्याचं सांगितलं. तेव्हा राज ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत, ते आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, सत्तेत जाण्याआधी त्यांनी वेळी दिला आहे, मी तुमचे फोटोही पाहिले आहेत, तरीही ते भेटल्यास नक्की सांगणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अद्यापही सुत जुळल्याचं दिसून येत नाही, कारण पत्रकार परिषद, मुलाखतीत बोलताना राज ठाकरेंकडून कायमच उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात येतेयं. आजही पुन्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला लगावलायं.