Samantha Ruth Prabhu : ब्युटी विथ ब्रेन समंथा गणितात अव्वल; दहावीचं रिपोर्ट कार्ड व्हायरल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 26T124950.810

Samantha Ruth Prabhu Report Card: साउथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. तसेच ही अभिनेत्री तिच्या अभिनयाने चाहत्यांची मोठ्या प्रमाणात मनं जिंकत असते. समंथाचा चाहता वर्ग हा मोठा आहे. तिच्या अनेक सिनेमाना चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे.

सध्या तिचे दहावीचे रिपोर्ट कार्ड सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल झाले आहे. समंथा ही एक हुशार विद्यार्थिनी होती, हे तिचे दहावीचे रिपोर्ड कार्ड बघितल्यानंतर समजणार आहे. सामंथाच्या या व्हायरल रिपोर्ट कार्डमध्ये (Report card viral) असे दिसत आहे की, तिला सर्व विषयात ८० पेक्षा जास्त प्रमाणात मार्क्स मिळाले आहेत, तिला गणितामध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. इतर विषयामध्ये तिला ८० पेक्षा जास्त मार्क्स मिळाले आहेत.

एका ट्विटर अकाऊंटवरुन समंथाचे हे रिपोर्ट कार्ड शेअर करण्यात आले आहे. या रिपोर्ट कार्डचा फोटो रिट्वीट करत समंथा ने सांगितले आहे की ‘हा हा हे पुन्हा एकदा बघितलं.’ समंथाचं हे रिपोर्ट कार्ड बघून चाहत्यांनी ‘ब्यूटी विथ ब्रेन’ अशी कॉम्प्लीमेंट समंथाला देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)


समंथाचे आतापर्यंतचे चित्रपट
गेल्या काही दिवसांपूर्वी सामंथा रुथ प्रभूचा ‘शाकुंतलम’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाचे अनेकांनी कौतुक केले आहे. समंथाच्या १ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा ‘कुशी’ या सिनेमाचीही चाहते आवर्जून वाट बघत आहेत. समंथा ही सध्या वरुण धवनबरोबर ‘सिटाडेल’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे.

सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकानं घेतला अखेरचा निरोप

‘सिटाडेल’ या सीरिजच्या इंडियन व्हर्जनमध्ये समंथा (Samantha Ruth Prabhu) आणि वरुण धवन (Varun Dhawan) हे प्रमुख भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडन यांच्या ‘सिटाडेल’ या सीरिजचा ग्रँड प्रीमियर लंडनमध्ये पार पडला आहे.’सिटाडेल’ या सीरिजच्या प्रीमियरला समंथा आणि वरुण यांनी हजेरी लावली असल्याचे दिसून आले आहे.

समंथाच्या पुढील सिनेमांसाठी तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. समंथा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. ‘ये माया चेसावे’ या तेलगू सिनेमाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि नागा चैतन्यची भेट झाली होती. त्यानंतर ‘ऑटोनगर सूर्या’ या सिनेमाच्या सेटवर ते पुन्हा भेटले होते. ६ ऑक्टोबर २०१७ मध्ये समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले होते.

Tags

follow us