भाजप महाराष्ट्राची माती करायला निघालंय, संजय राऊतांचे टीकास्त्र

भाजप महाराष्ट्राची माती करायला निघालंय, संजय राऊतांचे टीकास्त्र

राज्यात सत्तेत असलेलं भाजप सरकार महाराष्ट्राची माती करायला निघाल्याचे टीकास्त्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत आज पुण्यातील पाटस इथं शेतकरी कृती समितीच्या कार्यक्रमाला आले होते. यावेळी ते बोलत होते.

Nirmala Sitaraman : महागाईचे मुख्य कारण, यामुळे वाढत आहेत खाद्यपदार्थांच्या किमती

राऊत म्हणाले, सध्या राज्यात घाणेरडे भ्रष्टाचार सुरु आहेत. भाजप आणि भाजपच्या नेत्यांकडून महाराष्ट्राची माती केली जात असून ईडी, सीबीआय दहशत निर्माण करुन पक्ष फोडण्याचं काम भाजपकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी भीमा साखर कारखाना चालवायला टेबलाखालून 36 कोटी रुपये दिले होते. एवढा मोठा भ्रष्टाचार फडणवीसांनी कसंकाय केला, असा सवालही राऊत यांनी यावेळी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस नेमकं कोणाला पाठिशी घालत आहेत. कोणती टोळी चालवत आहेत? असा सवाल उपस्थित करीत राऊतांना खोचक टोलाही लगावलाय.

Mann Ki Baat च्या 100 भागाच्या निमित्तानं येणार ‘हे’ खास नाणं

आजच्या कार्यक्रमासाठी सत्ताधाऱ्यांकडून 144 कलमाची भीती दाखवण्यात येत होती. 144 कलमाची भीती दाखवूनही प्रचंड मोठी सभा पार पडली आहे. याविरोधात आम्ही स्वस्थ बसणार नसू मी आवाज उठवलाय, माझा आवाज तुम्ही बंद करु शकणार नाहीत. मोदी शहांनाही ते जमणार नसल्याचं राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे.

दरम्यान, आपल्या पूर्वजांनी सुरु केलेला कारखाना कर्नाटकच्या निराणा नावाच्या माणसाला का चालवायला देता? असा सवाल राऊत यांनी केला. हा कर्नाटकचा निराणी कोण आहे, ते आमचं बेळगाव गिळून बसलेत आता कारखाना घेणार का? असंही राऊत म्हणाले आहेत. तसेच मी उद्या कर्नाटकाला चाललोयृ असून हा निराणी कोण ते बघणार असल्याचं राऊतांनी सांगितलं आहे.

माझ्यावर 160 केसेस आहेत, 161 होऊद्या, मी बाळासाहेबांचा शिष्य असून जो झुंजतो तोच टिकतो, या शब्दांत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं आहे. यासोबतच राऊत यांनी पोलिसांनाही धारेवर धरत भाष्य केलंय. राऊत म्हणाले जोवर सत्तेत आहात तोवर कितीही बंदोबस्त लावा पोलिसांनो, उद्या तुम्हाला आमच्या बंदोबस्तात राहायचंय म्हणून त्या पद्धतीने आमच्याशी वागा, असं आवाहन त्यांनी केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube