पुणे : दर्ग्यांविरोधात भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आहेत. मनसे नेते वसंत मोरेंच्या कार्यक्रमाला राज ठाकरे आज पुण्यातील गुजरवाडी इथं उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज ठाकरे पुण्यातल्या पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरातील अनधिकृत मशिदीबद्दल भाष्य करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सत्तार बोलायला पटाईत : संगमनेरच्या घोड्याचा लगाम दिला विखे पाटलांच्या हाती
राज ठाकरे यांचा हा वैयक्तिक दौरा आहे मात्र, त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. मनसे नेते वसंत मोरेंच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या डॉग पॉंटचे उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते होणार असून यावेळी ठाकरे या डॉग पॉंटची पाहणीदेखील करणार आहेत..
दरम्यान, पुण्यातल्या पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या अतिक्रमणाविरोधात राज ठाकरेंनी भूमिका घेतली होती. या अतिक्रमणाविरोधात राज ठाकरे कार्यकर्त्यांना सूचना देणार असल्याचंही समजतंय.
गुन्हेगारीच्या प्रश्नावरुन देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण आलेखच मांडला
यासोबतच राज ठाकरे आज पुण्यातल्या स्थानिक नेत्यांची बैठक घेणार असून मात्र ही बैठक कुठे घेणार आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, राज ठाकरे बैठकीत कार्यकर्त्यांना काय सूचना देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी मुंबईतल्या माहिम समुद्रातील मजारीभोवती केलेल्या अतिक्रमणाचा व्हिडिओ दाखवला. त्यानंतर ठाकरेंनी प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला होता.
Chat GPT लाही लागली गळती.. हजारो युजर्सचा डेटा लिक; वाचा अन् सावध व्हा !
अखेर ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर मुंबई जिल्हा प्रशासनाकडून मजारीभोवतालचं अतिक्रमण तत्काळ हटवण्यात आलं होतं. त्यानंतर आता राज्यातील इतरही भागातील दर्गाभोवतालच्या अतिक्रमणाचा मुद्दा समोर आला आहे.
दरम्यान, राज्यातील विविध भागांतील दर्ग्याभोवतालचे अतिक्रमण आणि पुण्यातल्या पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराबाबत आज काय भूमिका घेणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय.