Chat GPT लाही लागली गळती.. हजारो युजर्सचा डेटा लिक; वाचा अन् सावध व्हा !
ChatGPT Data Leak : चॅट जीपीटी (Chat GPT) ज्या खास पद्धतीने प्रश्नांची उत्तरे देत आहे ते पाहून याचे वापरकर्ते वेगाने वाढले आहेत. तंत्रज्ञानाचे अत्यंत विकसित रुप म्हणून ओळखल्या जात असलेल्या चॅटजीपीटीची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. पण, जरा थांबा तुम्हीही जर चॅटजीपीटीचे युजर असाल तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
जरा सावध व्हा, कारण नुकताच असा एक अहवाल आला आहे ज्यामुळे तुमचे टेन्शन नक्कीच वाढू शकते. या अहवालात खुलासा करण्यात आला आहे की एक ‘बग’मुळे चॅटजीपीटीच्या हजारो युजर्सच्या क्रेडिट कार्डच्या तपशीलासह संवेदनशील माहिती लिक झाली आहे.
वाचा : ChatGPT च्या नवीन आवृत्तीने जगाला केले चकित, आजारावरही सांगते नेमके औषध
एनगॅझेट च्या एका रिपोर्टनुसार एक चॅटजीपीटी युजरच्या सिस्टीममध्ये हा बग मिळून आला. ओपन एआयला जसे हे माहित पडले त्यांनी तत्काळ चॅटबोटला दुरुस्तीसाठी ऑफलाइन केले.
रिपोर्टवर विश्वास ठेवला तर या बगमुळे चॅटजीपीटी युजर्स दुसऱ्या युजर्सची चॅट हिस्ट्री देखील पाहू शकत होते. रेडिटवर या प्रकाराची माहिती देण्यात आली. ज्यामध्ये युजरने त्याच्या चॅटजीपीटी साइडबारचे स्क्रीनशॉट पोस्ट केले जे दुसऱ्या युजरची चॅट हिस्ट्री दाखवत होते. ओपनएआयला या प्रकरणी तपासणी दरम्यान चॅटबोटला दहा तास ऑफलाइन ठेवावे लागले.
ChatGPT : जगभरात पास, पण भारतात नापास; UPSC ची उत्तर नाही देऊ शकलं AI
कंपनीने ज्यावेळी याचा तपास केला तर त्यावेळी एका गंभीर सुरक्षेच्या कारणाची माहिती मिळाली. असेही कळले की चॅट हिस्ट्री बग जवळपास 1.2 टक्के चॅटजीपीटी प्लस सबस्क्राइबर्सची वैयक्तिक माहिती समोर आणू शकतो.
भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कंपनीने लाइब्ररी कॉल आणि लॉग चेक संबंधित ठोस पावले उचलली आहेत. जेणेकरून मेसेज ज्यांना पाठवले आहेत त्यांनाच ते मिळतील. त्याचबरोबर अशा घटना तत्काळ लक्षात येण्यासाठी लॉग इन मध्ये सुधारणा करणे आणि ते बंद झाले आहे किंवा नाही याची खात्री करणे यांचा समावेश आहे.