गुन्हेगारीच्या प्रश्नावरुन देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण आलेखच मांडला
मुंबई : आता कुठेतरी राजकारणाच्या (Politics)पलिकडे जाऊन पाहण्याची गरज आहे. हे सरकार आल्यानंतर काही गोष्टी घडल्या आहेत. पण कोणालाही धरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत, आणि होणारही नाही. अनेकवेळा महाराष्ट्राची (Maharashtra)चर्चा होत असते. कायदा सुव्यवस्थेची (Law and order)चर्चा ही आकडेवारीवरुन व्हावी. कारण आकडेवारी आपल्याला मांडता येते. मुळात सुरक्षितता महत्वाची असते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)सांगितले आहे. मुंबईसारखं (Mumbai) शहर आजच नाही तर वर्षानुवर्ष देशातील इतर शहरांपेक्षा महिलांसाठी सुरक्षित (Safe for women)मानले जाते. आकडेवारीनुसार इथे किती गुन्हे घडले? हे पाहण्यापेक्षा येथील महिलांसाठी अधिक सुरक्षित समजले जात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. ते अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधकांनी अनेक प्रश्न विचारले, त्याला उत्तर देताना बोलत होते.
आज मुंबईमध्ये महिला अर्ध्या रात्रीही लोकलमधून येते-जाते, रस्त्यावर वावरु शकते. त्यामुळे इतर शहरांपेक्षा मुंबई सुरक्षित असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी सागितले की, लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून पाहिले तर क्राईम रेटमध्ये महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर आहे. आणि लोकसंख्येमध्ये तसं पाहिले तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. दहाव्या क्रमांकावर आहोत म्हणजे काही चांगले आहोत असं काही म्हणणार नाही पण काही लोक सांगतात की, महाराष्ट्र एक नंबरला आहे, पण ते खरं नाही तर लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिले तर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
संजय राऊतांचा चेंडू आता राज्यसभेत, खुलाशातील मतांवरुन निलम गोऱ्हे नाराज
गुन्हेगारी रोखण्यासाठी मागच्या काळात आपण प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. सुमारे तीन हजार पाचशेपाच लोकांवर तडीपारी लावली आहे. 239 लोकांवर एमपीडीए लावला आहे. 182 प्रकरणांमध्ये 776 आरोपींवर मोक्कासारखी कारवाई केली आहे. आज आपण पाहिले तर जे काही वेगवेगळे गुन्हे आहेत. त्याचबरोबर अंमली पदार्थांबाबतही मोठी कारवाई केली आहे. आपण 5 ते 6 टक्के अधिक गुन्हे उघड केले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अॅन्टी नार्कोटीक्स सेल तयार झाला आहे. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आहेत, आयुक्त असतील तर तेही आहेत. या सर्वाचा आढावा घेऊन आपला रिपोर्ट राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला सातत्यानं सादर करावा लागतो.
शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात अधिक कारवाई केली जात आहे. कोयता गॅंगविषयी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याकडे कोयता गँगवगैरे अशी काही नाही. काही लोकं कोयता घेऊन लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीच्या काळात असे गुन्हे घडले. पण आता हे गुन्हे अतिशय कमी झाले आहेत. ते पहिले 1103 होते ते आता 116 वर आले आहेत. पुणे ग्रामीणला तर आता एकही गुन्हा नाही. पिंपरी चिंचवडमध्ये 11 आहेत. नाशिकमध्ये सात आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये एकही नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गुन्हे आहेत. तसेच संभाजीनगर ग्रामीणला एकही नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु केलेली आहे.
महिलांविरुद्धच्या बाबतचे जे गुन्हे आहेत. ते 2022 मध्ये 44 हजार 221 गुन्हे उघडकीस नोंदवले होते. त्याचबरोबर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण हे 2022 मध्ये 93.04 टक्के आहे. तर 2021 मध्ये ते 87 टक्के होते असेही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. त्याचवेळी महिलांवरील अत्याचार झाल्यानंतर त्यावर कारवाई करण्याचे प्रमाण 2020 मध्ये 44 टक्के आहे. तर 2021 मध्ये 56 टक्के, 2022 मध्ये ते 69 टक्के आहे. त्याचे प्रमाण 80 टक्क्यांच्या जवळ नेण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य असल्याचे यावेळी फडणवीसांनी सांगितले आहे.