Download App

Rajan Salvi : ठाकरेंच्या आणखी एका आमदाराभोवती ‘एसीबी’ चौकशीचा फास

  • Written By: Last Updated:

वैभव नाईकांमागोमाग (Vaibhav Naik) शिवसेनेचे उपनेते आणि आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे गेल्या काही दिवसांपासून एसीबीच्या रडारवर आले आहेत. राजन साळवी रायगड एसीबीच्या (ACB ) चौकशीमुळे चर्चेत आले असून, त्यांच्याभोवती चौकशीचा फास आवळला जात असल्याचं दिसत आहे. कारण आता एसीबीने जिल्हाधिका इतकंच नाही, तर शिवसेनेच्या (Shiv Sena) विधानसभेच्या संभाव्य उमेदवाराला देखील नोटीस आल्यानं वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Shrikant Shinde Birthday Celebration : पोलीस ठाण्यात खासदाराचा वाढदिवस, राष्ट्रवादीची मोठी मागणी |

रायगड एसीबीकडून राजन साळवी यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. याविषयी राजन साळवी यांचे स्वीय सहाय्यक सुभाष मालप यांची देखील चौकशी करण्यात आली. दरम्यान, राजन साळवी यांनी आमदार झाल्यापासून आमदार निधीतून आतापर्यंत खर्च केलेल्या निधीची आणि कामांची माहिती जिल्हा नियोजन विभागाकडे रायगड एसीबीनं मागविली. तसेच कार्यालयात जाऊन चौकशी केली असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.

माझ्या चौकशीत तुम्हाला काही सापडणार नाही, पण तुम्हाला मला अडकवायचं असेल, तर जरूर अडकवा. माझ्यावर गुन्हा दाखल करा. मला अटक करा, जेलमध्ये पाठवा. मी कोणत्याही प्रकारच्या धमकीला घाबरत नाही. पण माझ्यामुळे शासकीय यंत्रणा आणि इतर कोणाला त्रास देऊ नका, असा इशारा राजन साळवी यांनी दिला.

Tags

follow us