Beed Crime : बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. (Beed) सावकारी जाचाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. राम असाराम फटाले (42)असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान, त्यांनी चार पानी सुसाईड नोट लिहून ठेव्याचं समोर आलं आहे.
या सुसाईड नोटमध्ये भाजप भटके विमुक्त आघाडीचे डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्या नावासह त्यांच्या पत्नीचाही उल्लेख करण्यात करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी तीन आरोपींना अटकही केली आहे.
बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला; परळी तालुक्यातील सिरसाळ्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
काही दिवसांपूर्वीच लेकीच्या लग्नासाठी पैसे मिळत नसल्याने वडिलांनी पथसंस्थेच्या गेटलाच गळफास घेत आत्महत्या केल्याचा बीड जिल्ह्यात घडला होता. ती घटना ताजी असतानाच सावकारी जाचाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमके प्रकरण काय?
या प्रकरणी पेठ बीड पोलिस ठाण्यात डॉ. लक्ष्मण जाधव यांच्यासह सात जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. असे पोलीस निरीक्षक अशोक मोदीराज यांनी सांगितलं.
सुसाईड नोटमध्ये काय?
प्रिय आई व पप्पा सुजल व गौरी रेणुका,मी चांगला मुलगा पती वडील होऊ शकलो नाही तरी मला माफ करा..रेणुका तुला माझी जागा घेऊन माझे आई-वडील सुजल व गौरी यांची काळजी घ्यावी लागेल..शाम भाऊ लखन माझे मुले व बायको आई वडील यांचा सांभाळ करा व मला माफ करा..तुमचा सर्वाचा राम…माझे वडील यांच्याकडे माझी माती करण्यासाठी रुपये नाहीत.. माझी माती समाजाकडून वर्गणी करून करावी.. माझा दहावा, तेरावा, चौदावा करू नका.. कुणालाही मयतीला बोलावू नका.. वर्षश्राद्ध करू नका ही माझी इच्छा आहे… असे या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.