Sanjay Raut On Indian Army Attack In J&K : काश्मीरमध्ये देशाच्या संरक्षण करणाऱ्या जवानांची उघड्या डोळ्यांनी कत्तल होत आहे. जवानांवर पुलवामासारखा हल्ला केला जातो हे देशाचे दुर्दैव असून, हा मिनी पुलवामा हल्ला आहे. मात्र, असे असताना सत्तेतील सरकार राम मंदिराच्या उत्सवात मग्न आहे. जवानांची कत्तल उघड्या डोळ्यांनी पाहून राम मंदिराच्या घंटा वाजवायला जायचं. या घंटा यांच्या डोक्यात आपटल्या पाहिजेत असे म्हणत संजय राऊतांनी (Sanjay Raut) केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Vijay Wadettiwar : ‘जितेंद्र आव्हाड भांबावलाय’; एकेरी उल्लेख करत वडेट्टीवारांचा पलटवार
राऊत म्हणाले की, सरकारला लाज वाटत नाही, सरकार कोणता उत्सव साजरा करतंय? आणि कोणासाठी? देशाच्या सुरक्षेचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पूर्णपणे खेळखंडोबा केला आहे.जम्मू कश्मीर येथील पूछ जिल्ह्यामध्ये जवानांवर हल्ला झाला. 370 कलम हटवल्यानंतर हे उत्सव साजरा करत असल्याचे राऊत म्हणाले.
संसदेत बेरोजगार तरुण घुसून सुरक्षेला तडे मारतात. संसदेत चर्चा होऊन दिली जात नाही. दीडशे खासदार निलंबित होतात हे सगळं होत असताना भाजप सरकार अयोध्येत उत्सव साजरा करायला जात आहे. यावेळी त्यांनी राम मंदिरासाठी ज्यांनी योगजान दिले त्यांना उद्घाटनाला बोलवलं जाणार नसल्याचे म्हणत शिवसेनेला निमंत्रण नाही. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही. बाळासाहेब ठाकरे यांनादेखील त्यांनी निमंत्रण दिलं नसतं यामागे एकमेव कारण म्हणजे श्रेय घेण्याचं राजकारण होय.
RSS चा जातीय जनगणनेला पूर्ण पाठिंबा! दिल्लीतून फिरली सूत्र, दोन दिवसातच बदलली भूमिका
आयोध्यात राम मंदिर बनण्यात शिवसेनेचे मोठं योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे देखील योगदान मोठं आहे. मात्र, असे असतानादेखील आम्हाला ते बोलवणार नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्या ठिकाणी गेले तर, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा जयजयकार होईल. प्रभू श्रीराम हे सर्वांचे असून, ते एका राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे नाही. एकदा सत्तेतील सरकारचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या मग आम्ही धार्मिक उत्सव करू असेही यावेळी राऊतांनी म्हटले आहे.