Ram Mandir : राम मंदीर (Ram Mandir) निर्मिती एक साहसी कार्य आहे. तसेच ते केवळ ईश्वराच्या इच्छेमुळेच शक्य झालं. तर आज संपूर्ण जगाला भारताचीच गरज असल्याने भारताने सज्ज होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिप्रादन सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagavat) यांनी केलं. ते आज (5 फब्रुवारी) ला गीता भक्ति अमृत महोत्सव गीता परिवार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या गोविंद देव गिरिजी महाराज यांच्या 75 व्या जयंती कार्यक्रमामध्ये बोलत होते.
‘ज्यांनी मोठं केलं त्यांनाच तुम्ही..,’; ‘शरद पवार हुकूमशाह’ म्हणणाऱ्यांना आव्हाडांनी सुनावलं
यावेळी भागवत म्हणाले की, 22 जानेवारीला झालेल्या आयोध्यातील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार मला होत आलं. हे माझ्यासाठी भाग्य आहे. तसेच कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर राम मंदिराची निर्मिती होणे हे एक साहसी काम होतं. तर आजच्या पिढीला राम मंदिराची निर्मिती होताना बघणं हे त्यांचं सौभाग्यामध्ये होतं. तसेच राम मंदिराची ही निर्मिती केवळ आणि केवळ भगवंताचा आशीर्वादाने इच्छेमुळे यशस्वी होऊ शकली.
मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात, नातेवाईकांनाही उमेदवारी
त्याचबरोबर भारताला विकसित होणं गरजेचं आहे. कारण संपूर्ण जगाला भारताची गरज आहे. त्यामुळे जर भारत एका उंचीवर जात नसेल तर पूर्ण पृथ्वीला विनाशाचा सामना करावा लागेल. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जगातील अनेक बुद्धिजीवी ही गोष्ट मान्य करतात. असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी गोविंद देवगिरीजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा ही दिल्या आणि राम मंदिर निर्मिती बद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही केला.