Rohit Pawar On Nilesh Ghaywal : पुण्यातील गुंड निलेश घायवळ सध्या राज्यातील राजकारणात चर्चेत असून या प्रकरणात विरोधक सरकारवर टीका करताना दिसत आहे. निलेश घायवळच्या बंधूला शस्त्रपुरावा मिळाल्याने विरोधक आता चारही बाजून गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर आरोप केल्याने पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आले आहे.
गुंड निलेश घायवल याचे सत्तेत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांशी घनिष्ट संबंध असल्याचा आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. ते आज मुंबईत (Mumbai) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. तसेच निलेश घायवळ विधानपरिषद सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांच्या जवळचा असून राम शिंदे यांनी ओपन मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी निलेळ घायवळचा उपयोग केला असल्याची चर्चा असून राम शिंदे यांनीच निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याला परदेशात पळून जाण्यासाठी मदत केली असल्याचा आरोप देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रोहित पवार यांनी केला आहे.
राम शिंदे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना फोन करुन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली असावी अथवा गृहमंत्रालयातून त्यासाठी योगेश कदमांवर दबाव आला असावा असा आरोप देखील रोहित पवार यांनी केला आहे.
गाझामध्ये शांतता, इस्त्रायल – हमासमध्ये स्वाक्षरी; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रोहित पवार पुढे म्हणाले की, राम शिंदे, संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांच्याशी हितसंबंध असल्याचा आरोप करत निलेश घायवळच्या भावाला गुन्हेगारी रेकार्ड असूनही बंदुकीचा परवाना देण्यात आला एरवी व्यापाऱ्यांना गरज असूनही बंदुकीचा परवाना सहज मिळत नाही पण गुंडाच्या भावाला सहजपणे बंदुकीचा परवाना मिळत असेल तर यामध्ये वरिष्ठ स्तरावरील लोक गुंतले असून त्यामध्ये राम शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीसांचा समावेश असू शकतो असा देखील आरोप आमदार रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला.