Ranajagjitsinh Patil : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यात राणाजगजितसिंह पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यांनी काल काक्रंबा, सलगरा, होर्टी गावात प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधला. (Ranajagjitsinh Patil) या दौऱ्यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्तांसह नागरिकही त्यांच्यासोबत पाहायला मिळाले. ठिकठिकाणी त्यांनी स्वागत होत आहे.
जिल्ह्यात महायुती सरकारच्या माध्यमातून मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. रखडलेल्या अनेक प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून होर्टी आणि मुर्टा या ठिकाणी २५० एकरापेक्षा जास्त भूसंपादनाचे नियोजन आहे. येथील जागेची पाहणी व सर्वेही झाला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीकडून ना हरकत घेऊन अडीचशे एकरावर सोलरचा प्रकल्प उभारणार आहोत असं आश्वासन राणा पाटील यांनी यावेळी दिल आहे.
Vidhansabha Election : राणाजगजितसिंह पाटलांनी केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गाडीचे सारथ्य !
औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी एमआयडीसीचे तत्वता मान्यता दिली आहे. पुढील ५ वर्षात हे प्रकल्प पूर्ण करून प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल. आपले सरकार हे विकासाचे व्हिजन घेऊन काम करत आहे, त्यामुळे आपली साथ असल्याशिवाय हे व्हिजन पूर्ण होणार नाही. आपले सरकार असल्यामुळे माझ्या माय बाप शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा मिळावा म्हणून कोर्टात जाऊन पैसे मिळवून दिले असंही त्यांनी नागरिकांना सांगितलं.
राहिलेले पैसे देखील व्याज सहित आपण मिळवणारच असं सांगत अशक्यप्राय वाटणारे अनेक प्रकल्प आणि योजना मागील अडीच वर्षांच्या काळात आपल्या सर्वांच्या सोबतीने यशस्वी करून दाखविल्या आहेत. भविष्यात यापेक्षाही अधिक ताकदीने आपल्याला पुढे जावयाचे आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य महत्वपूर्ण आहे असंही ते यावेळी म्हणाले.