Download App

माढ्यात मोहिते-पाटलांचा डाव; रणजीत नाईक-निंबाळकरांची झोप उडणार!

“भारतीय जनता पक्षाकडे मी माढा लोकसभा निवडणुकीसाठी तिकिटाची मागणी करणार आहे. माढ्यातून लढण्यासाठी मी इच्छुक आहे. कारण या मतदारसंघात मी पक्षाचे काम केलेले आहे” असे म्हणत भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील (Dhairysheel Mohite Patil) यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. पूर्वी मोहिते पाटील हे केवळ दावा करत होते. मात्र नुकतचं पाडव्याच्या मुहुर्तावर त्यांनी शड्डूच ठोकल्यामुळे माढ्याचे भाजपचे (BJP) विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्यासमोर पक्षातूनच पहिले आव्हान उभे राहिले आहे. शिवाय मोहिते पाटील कुटुंबीय विरुद्ध रणजीतसिंह नाईक निंबाळकर असा सुप्त संघर्षही समोर आला आहे. (Ranjitsinh Naik Nimbalkar Vs Mohite Patil Family in Madha Lok Sabha Constituency)

वर वर जरी धैर्यशील मोहिते पाटलांची घोषणा वाटत असली तरी हा थेट संघर्ष संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबीय विरुद्ध रणजीतसिंह नाईक निंबाळकर असाच आहे. ज्या मोहिते पाटील कुटुंबियांनी 2019 सगळी राजकीय ताकद पणाला लावत न निंबाळकरकरांसाठी विजयश्री खेचून आणली आता त्याच मोहिते पाटलांना निंबाळकर नकोसे झाले आहेत. याच विरोधातून आता त्यांच्या उमेदवारीला विरोध होऊ लागला आहे. भाजपलाही प्रत्येक जागा महत्वाची असल्याने मोहिते पाटलांना दुखवून चालणार नाही. पण त्यानंतर जरी भाजपने निंबाळकरांना तिकीट दिले तरीही मोहिते पाटलांशिवाय माढ्याची जागा जिंकण भाजपला अवघड होऊ शकतं. त्याची कारणही तशीच आहेत.

हेच सगळं नेमकं काय राजकारण आहे, ते आज आपण जाणून घेणार आहोत.

जुना पंढरपूर मतदारसंघ जाऊन 2009 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, सांगोला आणि माढा हे चार विधानसभा मतदारसंघ तर सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ मिळून एकत्रित माढा हा मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघात प्रामुख्याने प्रभाव आहे तो मोहिते पाटील कुटुंबियांचा. मोहिते पाटील जिथे सत्ता तिथे असे साधारण या भागातील मागील 4 ते 5 दशकांपासूनचे समीकरण राहिले आहे.

Chhagan Bhujbal : ‘संभाजीराजे तुम्ही फक्त एका समाजाचे नाहीत’; छगन भुजबळांनी संभाजीराजेंना सुनावलं

2009 मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तर 2014 मध्ये राज्याचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादीचा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख होती. 2019 च्या निवडणुकीत मात्र शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणे बदलली आणि मोहिते पाटील कुटुंबीय राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले, तर रणजितसिंह नाईक निंबाळकर काँग्रेसमधून भाजपमध्ये आले. भाजपने निंबाळकर यांना उमेदवारी दिली. मग राष्ट्रवादीनेही त्यांच्या विरोधात मोहिते-पाटील विरोधक माढ्याच्या संजय शिंदे यांना मैदानात उतरविले.

भाजपने मोहिते पाटलांना हाताशी धरत प्रचंड जोर लावला होता. पंतप्रधान मोदींची सभा अकलूजमध्ये पार पडली. दुसऱ्या बाजूने संजय शिंदेंच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार, अजित पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी ताकद लावली होती. अशातच एका सभेत मोहिते-पाटील यांनी भाजपला एकट्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून एक लाखाचे मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द दिला. निकाल लागल्यानंतर हाच शब्द खरा ठरला आणि निंबाळकर यांना माळशिरसमधून एक लाख 630 मतांची आघाडी मिळाली. हीच आघाडी निंबाळकरांना विजयासाठी कामी आली. कारण त्यांच्या आणि शिंदेंच्या मतांमध्ये अंतर होते 85 हजार 764.

जायकवाडी पाणी वाटप वाद पेटला…विखेंच्या भूमिकेवर मुंडेंचा नाराजीचा सूर

बाकी विधानसभा मतदारसंघातून शिंदे यांना आघाडी मिळाली होती. माढ्यातून शिंदेंना 6 हजार 505 मते, करमाळ्यातून 30 हजार 429 आणि सांगोल्यातून 3 हजार 374 मतांची आघाडी होती. तर निंबाळकर यांना फलटणमधून 21 हजार 215 मतांची, माणमधून 23 हजार 215 मतांची आणि माळशिरसमधून एक लाख 630 मतांची आघाडी मिळाली होती. संपूर्ण निकालात निंबाळकर यांना मिळाली होती 5 लाख 86 हजार 314 आणि शिंदे यांना मिळाली होती 5 लाख 550 मते. शिंदे 85 हजार 764 मतांनी विजयी झाले होते. हीच मतांची आकडेवारी पाहता मोहिते-पाटील हेच निंबाळकर यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते.

मात्र विजयानंतर राजकीय गणित बदलू लागली. सुरुवातीला मधुर असणाऱ्या संबंधांमध्ये मिठाचा खडा पडला. निंबाळकर यांनी ज्येष्ठतेनुसार मोहिते-पाटील यांच्याशी जुळवून न घेता पंगा घेतल्याचे स्थानिक पत्रकार सांगतात. त्यातही निंबाळकर यांनी मोहिते-पाटील विरोधकांशी जवळीक वाढविली. त्यामुळे गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून सुप्त संघर्ष सुरू झाला. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हाच संघर्ष भाजपच्या आणि नाईक निंबाळकर यांच्यासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.

त्याचवेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा मतदारसंघात आपली ताकद वाढवू लागले आहेत. अजित पवार राज्यातील सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे हे उघडपणे रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा देत आहेत. तर 2019 मध्ये ज्या संजय शिंदे यांनी निंबाळकरांविरोधात निवडणूक लढविली होती त्या शिंदे यांनी निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची घोषणा केली आहे.

भुजबळांना फडणवीसांनीच जरागेंच्या विरोधात उभं केलं, अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप

दुसऱ्या बाजूला मोहिते पाटील यांनीही ताकद दाखवत मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच शंकर कारखान्याच्या विस्तारीकरण कार्यक्रमात मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांचे स्थानिक विरोधक रामराजे निंबाळकर यांच्यासह जवळपास 64 आजी-माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाला निमंत्रित केले होते. यातून निंबाळकर आणि त्यांना साथ देणारे बबनदादा शिंदे, संजया शिंदे यांना मात्र वगळले होते.

त्यामुळेच आगामी काळात जर भाजपला निंबाळकर यांना तिकीट द्यायचे असल्यास मोहिते पाटील यांची समजूत काढावीच लागले. किंवा धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी लागेल किंवा मोहिते पाटील समर्थकाला. अन्यथा भाजपला हातची जागा घालवून बसण्याची वेळ येऊ शकते.

Tags

follow us