Download App

मोठी बातमी, आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिल उपकर्णधार

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

  • Written By: Last Updated:

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची (Asia Cup 2025) घोषणा करण्यात आली आहे. 9 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ 14 सप्टेंबर रोजी आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तान विरुद्ध (IndvsPak) सामना खेळणार आहे.

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची निवड केली आहे. सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलकडे (Shubman Gill) या स्पर्धेसाठी उपकर्णधार पद देण्यात आले आहे. तर निवड समितीने यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरला या संघात स्थान दिलेला नाही.

तर दुसरीकडे अजित आगरकर यांनी दिलेल्या माहितीनुसाक, आशिया कपसाठी पाच खेळाडू स्टँडबायवर असणार आहे. प्रसिद्ध कृष्णा, वॅशिंग्टन सुंदर, रियाग पराग, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वालचा समावेश आहे.

आशिया कप 2025 साठी भारतीय संघ ग्रुप ए मध्ये 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध, 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध आणि 19 सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असून पण सर्व सामने यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहे.

आशिया कप 2025 साठी भारतीय संघ

सूर्य कुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर ), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित सिंह राणा आणि रिंकू सिंग

‘कांतारा’च्या प्रिक्वेलमध्ये गुलशन देवैया कुलशेखरच्या भूमिकेत; पॅन-इंडिया चित्रपटातील दमदार पदार्पण! 

follow us