Download App

शिवसेनेच्या पडझडीला महिला मोर्चा सांभाळणार? उद्धव यांच्या मदतीसाठी रश्मी ठाकरे मैदानात

  • Written By: Last Updated:

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (rashmi thackeray) या नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. नाशिक येथे शिवसेनेच्या महिला मोर्चाला त्या मार्गदर्शन करणार असल्याचं बोलले जात आहे. पण यावर ठाकरे गटाकडून अजूनही यावर दुजोरा दिला गेलेला नाही.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेचे अनेक आमदार आणि खासदार पक्षातून बाहेर पडले. या नेत्यांसोबत काही पदाधिकारी गेले असले तरी अनेक पदाधिकारी मात्र अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत टिकून आहेत. अनेकांचा कयास होता की शिवसेना नाव आणि चिन्ह मिळालं की ठाकरे गटातुन अनेक दुसऱ्या फळीतले नेते शिंदे गटात सामिल होतील, पण तस झालेलं दिसत नाही.

Devendra Fadnavis ; ‘भेगा पडलेली वज्रमूठ आमचा सामना करु शकत नाही’

पण शिंदे गटाने नाशिक जिल्ह्यात मात्र मोठी फूट पाडली आहे. महानगरपालिका आणि ग्रामीण मधील अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले. विशेषतः नाशिक जिल्ह्याची जबाबदारी खुद्द संजय राऊत यांच्याकडे आहे. राऊत यांचे खास-जवळचे समजले जाणारे देखील पक्ष सोडून गेले. दरम्यान शिंदे गटाने राऊत यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केले आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर गेले, त्या त्या वेळी ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे.

अशा परिस्थितीतीमध्ये नाशिक महिला पदाधिकारी यांनी थेट रश्मी ठाकरे यांनाच मेळावा घेण्याची विंनती केली आहे. नाशिक मधील ही पडझड रोखण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांनीच नाशिकमध्ये लक्ष घालावं, अशी मागणी केल्याची माहिती आहे. यातूनच हा महिला मेळावा होत असल्याचे बोललं जात आहे.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे अनेक आमदार संपर्कात; फडणवीसांनी दिले मेगाभरतीचे संकेत, पक्ष प्रवेशाची वेळही सांगितली

पण रश्मी ठाकरे थेट सक्रिय राजकारणात उतरणार नाहीत, हे स्पष्ट आहे. त्यातही उद्धव ठाकरे यांची खिंड लढवणारे संजय राऊत यांच्या कार्यक्षेत्रात थेट हस्तक्षेप होणार नाही, याचीही काळजी मातोश्रीच्या वतीने घेतली जाईल, असं बोललं जात आहे.

गेल्या काही महिन्यात रश्मी ठाकरे यांनी महिलांच्या दोन मेळाव्यांना हजेरी लावली होती. याचा चांगलाच परिणाम पाहायला मिळाला होता. राज्यातल्या सर्वच पक्षात शिवसेनेची महिला आघाडी सर्वात आक्रमक आहे. त्याच बरोबर महिलांचं सभांना हजेरी लावण्याचे प्रमाण देखील शिवसेनेत अधिक आहे. अशा महिला आघाडीला रश्मी ठाकरे यांच्यामुळे ताकद नक्कीच मिळेल. पण नाशिक मध्ये प्रत्यक्ष हस्तक्षेप झाल्यास आधीच दोन गट झालेल्या सेनेत आणखी दोन गट निर्माण होतील, असं सांगण्यात येत आहे.

Tags

follow us