Download App

Sanjay Raut : राऊतांच्या वक्तव्यावरून विधान परिषदही गाजली…

मुंबई : आज विधान परिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आमदार राम शिंदे हे राज्यपालांच्या अभिभाषणाचं समर्थन करताना ते बोलत असताना विधिमंडळ हे तर चोरमंडळ आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून राऊत यांच्याविरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी शिंदे गट आणि भाजपने (BJP)केली.

यावेळी राम शिंदे यांनी विधिमंडळाच्या विधान परिषद सभागृहात हक्कभंग प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली. त्यावेळी विधान परिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान गदारोळ झाला. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.

budget session : संजय राऊतांनी बंद पाडली विधानसभा आणि विधानपरिषद

दरम्यान, विधान सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन सभागृहात गोंधळ उडाला आहे. सभागृहात गोंधळ उडाल्यानंतर आजच्या दिवसापर्यंत सभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. तर संजय राऊतांच्या हक्कभंगाच्या कारवाईवर 8 मार्चला निर्णय होणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात खंडीत झालेल्या विकासाला शिंदे-फडणवीस सरकारने गतिमान करण्याचं काम केलं आहे. यावेळी आमदार राम शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये त्यांनी मेट्रो, पेन्शन योजना, यांसारख्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. आज विधान परिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आमदार राम शिंदे हे राज्यपालांच्या अभिभाषणाचं समर्थन करताना ते बोलत होते. या अगोदर आमदार प्रविण दरेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलले.

Tags

follow us