budget session : संजय राऊतांनी बंद पाडली विधानसभा आणि विधानपरिषद

budget session : संजय राऊतांनी बंद पाडली विधानसभा आणि विधानपरिषद

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य केले होते. राऊतांच्या त्या वक्तव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजप आणि शिवसेना गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग दाखल करुन घेतला आहे. दोन दिवसांत चौकशी करुन ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करेन असे अध्यक्ष यांनी जाहीर केले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपकडून सभागृहात गोंधळ सुरुच होता. त्यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

Uday Samant : राऊतांचे विधान हे संपूर्ण महाराष्ट्राला लाजवणारे आहे

खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटले. यावरून शिवसेना आणि भाजप आमदार आक्रमक झाले. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. या मुद्द्यावरून चार वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

मात्र, या विषयावर सभागृहातील सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या उज्वल परंपरेचा अपमान केला आहे. सभागृहाचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे दोन दिवसात चौकशी करून सभागृहात ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करेन असे अध्यक्ष यांनी जाहीर केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube