Ravindra Chavan : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे 29 महापालिकेत महायुतीचा महापौर असणार असल्याचा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. कल्याण – डोंबिवली महापालिकेसाठी आज (15 जानेवारी) सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला.
यानंतर माध्यमांशी बोलताना रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी प्रचार केला आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे 29 महापालिकेत महायुतीचा महापौर असेल असं माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले. तर दुसरीकडे 16 जानेवारी राज्यातील 29 महापालिका निवडणुकींचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांनी काही ठिकाणी युती आणि आघाडी करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवत आहे. तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केल्याने मुंबईत देखील कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
धुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड
तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाले असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 4,5,10,11 या प्रभागांमध्ये मध्ये तांत्रिक बिघाडामुळे ईव्हीएम मशीन बंद पडले असून प्रशासनाच्या वतीने तात्काळ मशीन मधील तांत्रिक अडचण दूर करत पुन्हा मशीन सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
पुणे महापालिकेसाठी तब्बल 9 वर्षांनंतर मतदानाला सुरुवात; 35 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
