मोठी बातमी! बारामतीत पुन्हा विमान अपघात; अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच कोसळलं

Redbird Trainer Aircraft : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आज पुन्हा एकदा बारामतीत विमानाचा अपघात झाला आहे. माहितीनुसार, रेड

Redbird Trainer Aircraft

Redbird Trainer Aircraft

Redbird Trainer Aircraft : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आज पुन्हा एकदा बारामतीत विमानाचा अपघात झाला आहे. माहितीनुसार, रेड बर्ड कंपनीचे शिकाऊ विमानाचा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील गोजुबावी परिसरात या शिकाऊ विमानाला अपघात झाला आहे. हा अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

रेड बर्ड कंपनीच (Redbird Trainer Aircraft) हे विमान असून गोजबाबी गावाच्या हद्दीत ते पडलेल आहे. यातील वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती आहे. याच गावात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाला अपघात झाला होता. यापूर्वी देखील रेडबर्ड या कंपनीची विमाना या ठिकाणी कोसळलेली आहे.

या ठिकाणी शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं. कारवार एव्हिशन आणि रेड बर्ड या दोन संस्था बारामती मध्ये वैमानिक प्रशिक्षण देतात. यापूर्वी देखील रेडबर्ड कंपनीवरती बंदी घालण्यात आली होती.

नाशिकनंतर NEET पेपर फुटीप्रकरणात पुणे कनेक्शन समोर; 15 लाखात विकला पेपर?

 28 जानेवारी 2026 रोजी याच गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. या विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं होतं. सध्या या प्रकरणाची सीआयडीकडून सखोल चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी या प्रकरणात विमान कंपनी मालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती.

आणखी एक धक्का, सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात मोठी वाढ; आजपासून लागू

Exit mobile version