Download App

‘सावरकरांबद्दल आदर म्हणूनच मी 1983 ला …’, आत्मचरित्रात सुशीलकुमार शिंदेंनी केला मोठा खुलासा

Sushilkumar Shinde Autobiography : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचं

  • Written By: Last Updated:

Sushilkumar Shinde Autobiography : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचं ‘फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स’ (Five Decades in Politics) नावाचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. या आत्मचरित्रात सुशीलकुमार शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोडावर काँग्रेसची (Congress) कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुशीलकुमार शिंदे काही काळासाठी देशाचे गृहमंत्री देखील राहिले आहे तसेच त्यांनी राज्यपाल म्हणून देखील जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी सावरकरांनी प्रयत्न केले आणि सावरकर हे विज्ञानवादी होते असं म्हटले आहे तसेच सावरकरांचे संकुचित विचार हे आव्हानच आहे आणि आता काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आण्याची गरज आहे असेही त्यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरून भाजप पुन्हा एकदा काँग्रेस आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधणार आहे.

आत्मचरित्रात नेमकं काय म्हटलं आहे?

सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, माझ्या मनात सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर आहे त्यामुळे मी 1983 ला नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला हजर राहिलो होतो आणि सावरकरांना पाठिंबा दिलेल्या मुद्द्यांवर मी ठाम राहिलो होतो असेही त्यांनी म्हटले आहे. सावरकरांनी आपल्या काळात अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मी देखील मागासवर्गातील असल्याने सावरकरांच्या प्रयत्नांचे मला विशेष महत्त्वं वाटते असं सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.

त्यांनी आपल्या आत्मचरित्रात पुढे म्हटले आहे की, आज देखील जेव्हा सावरकरांचा मुद्दा निघाला तर त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीवर इतका भर का? दिला जातो, याचं मला आश्चर्य वाटतं कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत असं देखील सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.

तसेच सावरकरांमधला तत्वज्ञ आणि विज्ञानवादी आपण पाहू शकत नाही का? ते सामाजिक, समता आणि दलितांच्या उद्धाराचा मुद्दा घेवून उभे राहले होते, त्यामुळे सावरकरांचे संकुचित विचार हे आपल्यासमोरचं एक आव्हान आहे असं देखील सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.

येवला मतदारसंघात शरद पवारांचा डाव, छगन भुजबळांविरोधात देणार ‘या’ उमेदवाराला संधी

तसेच इतके दिवस राजकारणात काम केल्यानंतर मला वाटतं की, काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणण्याची आता गरज आहे असेही सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे.

follow us