Revenue Department : राज्याच्या महसूल विभागाने बदली झाल्यानंतर देखील कामावर हजर न झालेल्या महसूल विभागातील तब्बल 11 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच या अधिकाऱ्यांना एप्रिल महिन्यापासूनच कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली होती. मात्र त्याला या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
BSNL चा नवा धमाका! रिटायरमेंट प्लॅन लॉन्च; काय आहे खास?
बदलीनंतर 5 महिन्यांनी देखील कामावर नाही
राज्याच्या महसूल विभागाने 35 अधिकाऱ्यांची एप्रिल महिन्यात बदली केली होती. गेल्या कित्येक दिवस हे अधिकारी कामावर हजर झालेले नव्हते. त्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली होती. त्यानंतर काही अधिकारी कामावर हजर झाले. मात्र 11 अधिकारी अद्याप देखील कामावर हजर झाले नव्हते. त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कोण-कोणत्या अधिकाऱ्यांचं झालं निलंबन
राज्यात मुंबई, पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक असे महा महसूल विभाग आहेत. या महसुली विभागापैंकी नागपूर अमरावती विभागात रूजू होण्यास अधिकारी तयार होत नाहीत. त्यामुळे नागपूर विभागत रूजू न होणाऱ्या 7 तहसिलदारांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच 4 अशा 11 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
धर्माबद्दलच्या विधानानंतर Prakash Raj यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसात गुन्हा दाखल
दरम्यान अधिकाऱ्यांना जिल्ह्यात बदली झाली तर 3 दिवसांत आणि जिल्ह्याबाहेर बदली झाली तर 7 दिवसांत कामावर हजर व्हावे लागते. अन्यथा त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. तसेच याला उत्तर देताना अधिकाऱ्यांनी पर्याप्त कारण सांगितलं तर ते ग्राह्य धरले जाते. मात्र नसेल तर कारवाई केली जाते. तसेच या प्रकरणामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून क्रिम पोस्टवर असणाऱ्या अधिरकाऱ्यांचा मुद्दा उपस्थित झाला आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक अधिकारी आपल्याला हव्या त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.