धर्माबद्दलच्या विधानानंतर Prakash Raj यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसात गुन्हा दाखल

धर्माबद्दलच्या विधानानंतर Prakash Raj यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसात गुन्हा दाखल

South Film Industry: दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत (Bollywood) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांचे नेहमी मनोरंजन करणारे अभिनेते प्रकाश राज (Actor Prakash Raj) हे कायम चर्चेत असतात. ते सतत ट्विटरवरून अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांबद्दल सडेतोड मतं मांडत असल्याचे बघायला मिळत असतात.(Police ) त्यांनी बंगळुरूमध्ये अधिकृत तक्रार दाखल केल्याची सध्या माहिती मिळत आहे.

एका युट्यूब चॅनेलने चिथावणीखोर मजकूर प्रसारित केल्याने त्यांचा जीव आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आल्याची माहिती प्रकाश राज यांनी यावेळी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश राज यांच्या तक्रारीनंतर बंगळुरूमधील अशोक नगर पोलिसांनी ‘टिव्ही विक्रम’ या यूट्यूब चॅनलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनातन धर्माबद्दल प्रकाश राज यांनी केलेल्या टिप्पणीवर हा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prakash Raj (@joinprakashraj)


या युट्यूब चॅनलच्या वादग्रस्त व्हिडीओ देखील जवळजवळ ९० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असल्याचे बघायला मिळाले आहे. “स्टॅलिन आणि प्रकाश राज यांना संपवले पाहिजे का? हिंदूंनी काय करायला हवं? तुमचे रक्त उकळत नाही का?” अशा प्रकारचा आशय त्या व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे. प्रकाश राज यांनी सांगितलं आहे की, व्हिडीओमध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नकारात्मक पद्धतीने दाखविण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच ते चाहत्यांना आपल्याला नुकसान करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्यांनी त्या व्हिडीओमध्ये जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचा स्पष्ट प्रयत्न करत असल्याचं सांगत चॅनल मालक आणि संबंधित लोकांविरुद्ध त्वरीत कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

मिलन लुथरियाच्या ‘Sultan of Delhi’च्या टीझरने सोशल मीडियावर चर्चेला उधाण

तसेच प्रकाश राज यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६, ५०४, ५०५ (२) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी देखील सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर धमकी प्रकरण घडल्याचे सांगितले जात आहे. सनातन धर्म आणि हिंदुत्वाचे आक्रमकपणे समर्थन करणारे लोक हिंदू धर्मामध्ये भांडणे लावून राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचे प्रकाश राज यांनी यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube