BSNL चा नवा धमाका! रिटायरमेंट प्लॅन लॉन्च; काय आहे खास?

BSNL चा नवा धमाका! रिटायरमेंट प्लॅन लॉन्च; काय आहे खास?

BSNL : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनल BSNL ही खासगी दूरसंचार कंपन्या Jio, Airtel, Vi सारखाच आपल्या युजर्सला चांगला अनुभव देण्यासाठी नवनवीन प्लॅन आणत आहे. यावेळी BSNLने एक नाही तर दोन नवीन धमाकेदार प्लॅन आणले आहेत. BSNL कंपनीने या दोन नवीन प्लॅनला रिटायरमेंट प्लॅन (Retirement Plan)असं नाव दिलं आहे. या प्लॅनची ​​किंमत 411 रुपये आणि 788 रुपये आहे. 411 रुपयांचा प्लॅनला 90 दिवसांची तर 788 रुपयांच्या प्लॅनसाठी 180 दिवसांची वैधता दिली जात आहे.

Sanjay Shirsat : लोकसभा भाजपसाठी महत्त्वाची, पण मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागेल; शिरसाटांनी करून दिली आठवण

या दोन्ही प्लॅनमध्ये युजर्सला काय काय गोष्टी मिळणार आहेत. सविस्तर जाणून घेऊया.

BSNL चा 411 रुपयांचा प्लॅन
– या रिचार्जमध्ये दररोज 2GB डेटा 90 दिवसांच्या वैधतेसह दिला जात आहे.
– म्हणजेच यूजर्सना एकूण 180 GB डेटा मिळतो.
– दैनंदिन मर्यादा संपल्यानंतर त्याचा वेग 40kbps इतका कमी होतो.

बीएसएनएलचा 788 रुपयांचा प्लॅन
– BSNL च्या 788 रुपयांच्या व्हाउचरची वैधता 180 दिवस आहे.
– याशिवाय प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच एकूण 360 GB डेटा ऑफर केला जात आहे.
– एकदा मर्यादा गाठली की, त्याचा वेग 40 kbps इतका कमी होतो.

हे दोन्ही प्लॅन डेटा व्हाउचर आहेत. म्हणजेच ते तुमच्या चालू प्लॅनला चालना देतील आणि तुमचा नंबर सक्रिय करणार नाही. त्यासाठी तुम्हाला कॉमन व्हाउचर प्लॅन गरजेचा आहे. सध्या, हे दोन्ही प्लॅन संपूर्ण देशातील ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

ज्या युजर्सला जास्त दिवसांच्या डेटा व्हाउचरसह रिचार्ज करायचे आहे, त्यांच्यासाठी हे दोन्हीही व्हाऊचर प्लॅन चांगले आहेत. त्याचबरोबर BSNL ने 4G लाँच केल्यानंतर, हे प्लॅन ग्राहकांसाठी आणखी फायदेशीर ठरतील.

BSNL चे काही फायदेशीर प्रिपेड प्लॅन
107 रुपयांचा प्रिपेड प्लॅन :
BSNL चा 107 रुपयांचा प्रीपेड प्लान 40 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये 3GB डेटा, 200 मिनिटे व्हॉईस कॉलिंग आणि BSNL ट्यून ऑफर आहेत. ही एंट्री लेव्हल योजना तुम्हाला 40 दिवसांची वैधता आणि उदार व्हॉइस आणि डेटा फायदे देते. प्लॅनचा दररोजचा खर्च फक्त 2.67 रुपये असेल.

197 रुपयांचा प्रीपेड प्लॅन :
BSNL च्या 197 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता 84 दिवस आहे आणि ग्राहकांना 40 Kbps वर अमर्यादित वापर 2GB डेटा आणि अमर्यादित व्हॉइस आणि 18 दिवसांसाठी दररोज 100 SMS देते. 18 दिवसांनंतर, ग्राहक सामान्य शुल्कात सेवांचा आनंद घेऊ शकतात. प्लॅनचा दररोजचा खर्च 2.34 रुपये असेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube