देशाच्या राजकारणातील असलेले खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेचे प्रकाशन २०१५ साली झालं होत. आता शरद पवार यांच्या राजकिय जीवनावर आधारित लोक माझे सांगाती या आत्मकथेचा दुसरा भाग प्रकाशित होत आहे.
शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन उद्या मंगळवार, २ मे रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होणार आहे. ७० पानांची जोड असलेली ही आवृत्ती महाविकास आघाडीची निर्मिती या वर्तमान काळातील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीवर भाष्य करणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करीत २ मे रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाबाबत माहिती दिली आहे.
मी भुजबळांना घाबरत नाही, त्यांनी माझ्यासमोर निवडणुकीला उभं राहाव; कांदेंचं थेट आव्हान
आदरणीय पवार साहेबांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती आपल्या भेटीस येत आहे. दि. २ मे रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर (@ybchavancentre) येथे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल. आदरणीय साहेबांच्या आयुष्यातील २०१५ ते नंतरच्या घडामोडींची मांडणी या पुस्तकात सविस्तरपणे… pic.twitter.com/6Ul764t7Yn
— Supriya Sule (@supriya_sule) April 29, 2023
यापूर्वी लोक माझे सांगाती याचा पाहिला भाग प्रकाशित झाला आहे. आता नव्या आवृत्तीमध्ये २०१५ ते आतापर्यंतच्या राजकिय घडमोडी आणि अनुभव या नव्या भागात देण्यात येणार आहेत. २०१५ नंतर देशात अनेक राजकीय स्थितंतर घडली आहेत.
राज्यात आलेले भाजप सेना युती सरकार, पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर आलेले महाविकासआघाडी सरकार याबाबत या पुस्तकात कथन करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या भागात शरद पवार नक्की काय खुलासे करणार आहेत. हे पाहणे महत्वाचे आहे. मागच्या काही दिवसात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार, अजित पवार किंवा काही नेते भाजपसोबत जाणार याची चर्चा होत असतानाच शरद पवार यांचे हे पुस्तक येणे म्हणजे यातून नवे खुलासे होतील, असं सांगण्यात येत आहे.
अजित पवार विद्यार्थी झाले; बाकावर बसले अन् गणिताचा सरावही केला