Download App

नाशिकमधल्या माजुरड्या रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या; गुंडगीरीवर काय म्हणाले पोलीस?

या घटनेची नाशिक पोलिसांनी तातडीने दखल घेतली. काही तासांतच पोलिसांनी या रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या. कारमधील

  • Written By: Last Updated:

Nashik Rickshaw Driver : नाशिकमधील शालीमार चौकात कट मारल्याच्या रागातून रिक्षाचालकानं कारचालक आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली. तसंच शिवीगाळही केली होती. ही घटना काल, १४ मार्च रोजी घडली होती. (Rickshaw) या माजुरड्या रिक्षाचालकाचा उद्धटपणा आणि दादागिरी मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली होती.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या बदलांना विरोध; मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकी

या घटनेची नाशिक पोलिसांनी तातडीने दखल घेतली. काही तासांतच पोलिसांनी या रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या. कारमधील महिला ही हात जोडून माफी मागत असताना देखील चालकाने भररस्त्यात रिक्षा आडवी घातली. समोर महिला आहे हा विचार देखील त्याने न करता अरेरावी आणि शिवीगाळ केली. हा व्हिडिओ बघून नाशिकाकरांनी संताप व्यक्त केला होता.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रिक्षाचालकाचा वाहन परवाना वैध आहे का? तसंच, त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याचा तपास सुरू आहे. तसंच नाशिक पोलिसांनी अशा माजुरड्या रिक्षाचालकांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.

follow us