Download App

Gautami Patil : “तु आहेस लय भारी, होतीस का माझी परी” गौतमी होणार बीडची सुनबाई?

“सबसे कातिल गौतमी पाटील” (Sabsekatilgautamipatil) हे नाव कोणाला माहित नसलेला कुणी महाराष्ट्रात असूच शकत नाही कारण सारख्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेली गौतमी पाटीलला (Gautami Patil) आता एका बागायतदार मुलाने थेट लग्नाची ऑफर दिलीय. गौतमी तुझ्या सर्व अटी मान्य, बोल होतीस का माझी परी? या शब्दांत त्याने गौतमीला पत्राद्वारे लग्नाचं मागणं घातलंय.

गौतमी पाटील आणि सुषमा अंधारे दोन्ही अॅक्टर; शिंदे गटाच्या आमदाराने डिवचलं

बीडच्या केज तालुक्यातील रोहन गलांडे पाटील(Rohan Galande Patil) या शेतकरी पुत्राने मी गौतमी पाटीलसोबत(Gautami Patil marriage) लग्नासाठी तयार असल्याचं सांगितलंय. काही दिवसांपूर्वीच गौतमीने दिलेल्या मुलाखतीत मी आता 25 वर्षांची असून मला पैसा प्रसिद्धी नकोय, लग्न करुन घरसंसार करावा अशी माझी आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी नकोय, कुठल्याही परिस्थिती त्याने मला साथ दिली पाहिजेत, मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकलीय, त्यात भाऊ नाही त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा कधीही संबंध आलेला नाही. त्यामुळे माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा, म्हणून मी लवकरच लग्न करणार असल्याचं गौतमी पाटीलने (Gautami Patil) स्पष्ट केलं होतं.

पोपट, मौना, मोर अन् मांजरीनंतर आता राजकारण्यांच्या टीकेत गौतमी पाटीलची एन्ट्री

त्यानंतरच रोहन गलांडे पाटील याने गौतमी पाटीलला थेट पत्र लिहिलं आहे. रोहनने पत्रात म्हटले, गौतमी, तुझ्या इच्छा-अटी सर्व मान्य, बोल तू होती का माझी परी?” असं म्हणत आपल्या घराचा पत्ताही दिला आहे. एवढंच नाही, तर गौतमी तू लग्नाला तयार असशील तर येऊन भेट, असंही म्हटलं आहे.

Prasad Javade: बिग बॉस मराठीमधील ‘या’ अभिनेत्याला मिळाली नवी मालिका, साकारणार ही भूमिका

तसेच पुढे पत्रात म्हटले, गौतमी पाटील, तू भारी, तुझ्या घरी, पण तू होती का माझी परी? मी रोहन गलांडे पाटील, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहिण्याचे कारण एका मुलाखतीत तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना तू म्हणाली होतीस की, “आता मी २५ वर्षांची आहे. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.”

तुझ्या सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत. तरी मी रोहन गलांडे पाटील, मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तरी तू जशी आहेस, तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्यासोबत कुणी लग्नाला तयार नसले, तरी मी माणूसकीच्या नात्याने तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे.

गेहलोत-पायलट वादात काँग्रेस पक्षश्रेष्ठींची यशस्वी मध्यस्थी; राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये मोठा निर्णय

माझे वय २६ वर्ष आहे व मी एक शेतकरी पुत्र आहे. त्यामुळे शेती बागायती आहे, दुग्ध व्यवसाय आहे. तू जर माझ्यासोबत लग्नाला तयार असशील तर तू मला भेटायला ये. पत्ता मु. पो. चिंचोली माळी, तालुका केज, जिल्हा बीड, या पत्त्यावर तू मला भेटायला ये, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे” असे रोहन गलांडे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, गौतमी पाटीलला थेट पत्राद्वारे लग्नाची मागणी घातल्याने या पत्राची दखल घेऊन गौतमी प्रत्युत्तर देणार का? तसेच गौतमी पाटीलने जरी पत्राची दखल घेतली नाही, तरी गौतमी नेमकं कोणासोबत लग्न बंधनात अडकणार? याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.

Tags

follow us