Prasad Javade: बिग बॉस मराठीमधील ‘या’ अभिनेत्याला मिळाली नवी मालिका, साकारणार ही भूमिका

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 30T134850.820

Prasad Javade: कलर्स मराठी वाहिनीवर नुकतीच ‘काव्यांजली सखी सावली’ (kavya anjali sakhi savali) ही नवी मालिका (Serial) प्रदर्शित झाली आहे. या मालिकेत प्रेक्षकांना दोन बहिणींची प्रेमळ गोष्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या प्रोमोंनी देखील लक्ष वेधून घेतले आहे. यातच या मालिकेत आणखी एका कलाकाराची एन्ट्री झाली आहे. बिग बॉस मराठी (Marathi Bigg Boss ) सिझन चार मधील कलाकार प्रसाद जवादे (Prasad Javade) या मालिकेत झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prasad Jawade (@prasadjawade)


या मालिकेत तो प्रीतम ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेतील त्याची छोटीशी झलकही नुकतीच समोर आली आहे. तेव्हा या मालिकेतून प्रसाद कसं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बिग बॉस मराठीच्या आधी प्रसाद हा विविध मालिका, हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये झळकला आहे. नवी मालिका आणि भूमिकेविषयी प्रसाद सांगतो की, “बिग बॉस मराठीमध्ये मला प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळालं ते मी कधीच विसरु शकणार नाही.

खरंतर या प्रेमाची परतफेड करताच येणार नाही. पण मी खूप विचार केला की, ह्याचं एक रिटर्न गिफ्ट मी प्रेक्षकांना कसं देऊ शकतो. आणि तेव्हाच मला कलर्स मराठीकडून काव्यांजली – सखी सावली या मलिकेसाठी प्रीतमच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. प्रीतम या पात्राबद्दल ऐकताच मी ठरवलं की हेच असेल माझ्या चाहत्यांनसाठी एक छान रिटर्न गिफ्ट. काव्यांजली मालिकेद्वारे मी प्रेक्षकांना रोज भेटू शकतो, त्यांचं प्रेम अनुभवू शकतो.

‘मुस्लिमांचा द्वेष ही एक फॅशन बनली, सरकारकडून….’; नसीरुद्दीन शाह यांचे मोठे विधान

प्रीतमच्या भूमिकेचे पैलू लक्षात घेता, मला हे या मालिकेतील एक प्रभावशाली पात्र वाटतं. प्रीतम हा एक इंफ्लूएंजर आहे, त्याला प्रेमा विषयीचे लोकांचे प्रश्न सोडवणं, कविता करणं, त्याचं त्याच्या आईवर असलेलं अमाप प्रेम, आजच्‍या काळानुसार विचार करणं, असे प्रीतमचे पैलू लोकांसमोर सादर करणं माझ्यासाठी एक खूप मोठं आव्हान आहे. सर्वांना आवडणारा, लोकांच्या मनात घर करणारा, असा हा प्रीतम लवकरच तुमच्या भेटीला येतोय.” तेव्हा बिग बॉस मराठीनंतर प्रसाद या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतोय का हे मालिकेतून समोर येईलच.

Tags

follow us