रोहिणी खडसे खरात प्रकरणावर संतापल्या! ‘समन्स देऊन उपयोग नाही, थेट अटकेशिवाय सत्य बाहेर येणार नाही’

हा विषय अत्यंत गंभीर आणि खोल असून, केवळ समन्स पाठवून चालणार नाही. हे एक संघटित रॅकेट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

Untitled Design 119

Untitled Design 119

Rohini Khadse angry over Kharat case : नाशिकमधील कथित ‘खरात कांड’ प्रकरण आता अधिकच गहिरे होत चालले असून, या संपूर्ण प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. रोहिणी खडसे यांनी या प्रकरणात थेट अटक कारवाईची मागणी करत प्रशासनावर दबाव वाढवला आहे. रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, नाशिकमधील या ‘खरात कांड’मध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांना एसआयटीकडून समन्स बजावल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, हा विषय अत्यंत गंभीर आणि खोल असून, केवळ समन्स पाठवून चालणार नाही. हे एक संघटित रॅकेट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

त्यांच्या मते, या प्रकरणाचा पूर्ण पर्दाफाश करण्यासाठी संबंधित आरोपींना थेट अटक करण्यात यावी. कारण समन्स देण्याच्या प्रक्रियेत आरोपींना पुरावे नष्ट करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांसह आर्थिक व्यवहारांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाचा वेग वाढवला आहे. आता या तपासाची दिशा खरातशी संबंधित संस्थांकडे वळली असून, विशेषतः ‘शिवनिका’ या संस्थेच्या कामकाजावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट; मोबाईलमधील राजकीय नेत्यांचे नंबर डमी नावाने आणि मोठ्या लोकांशी संबंधांची चौकशी

या पार्श्वभूमीवर, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांच्या भूमिकेची तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘शिवनिका’ संस्थेच्या माध्यमातून अनेक आर्थिक व्यवहार आणि उपक्रम राबवले गेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्यांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय एसआयटीने घेतला आहे. लवकरच संबंधित सदस्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असून, संस्थेच्या निधीचा वापर, तसेच अशोक खरातला मिळालेल्या पाठबळाचा शोध घेतला जाणार आहे.

‘शिवनिका’ संस्थेच्या विश्वस्त मंडळात कॅप्टन अशोककुमार एकनाथ खरात, डॉ. जितेंद्र गणपतराव शेळके, सौ. कल्पना अशोककुमार खरात, ना. सौ. रूपाली निलेश चाकणकर, श्री. सुभाषराव केशवराव जमे, सीए ललित प्रकाश गोफणे आणि डॉ. नंदकिशोर तुकाराम काटो यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. एकूणच, ‘खरात कांड’ प्रकरणात आता राजकीय हस्तक्षेप, आर्थिक व्यवहार आणि संस्थात्मक जाळ्याचा तपास अशा तिन्ही स्तरांवर चौकशी सुरू असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version