Download App

मानहानीची एवढी काळजी होती तर कुटाणे केलेच कशाला?, रोहित पवारांचा कोकाटेंना सवाल

पुराव्याशिवाय मी बोलत नाही. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? असा सवाल रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंना केला.

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar : माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा (Manikrao Kokate) विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटेंकडील कृषिखात्याचा पदभार काढून घेण्यात आला. आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आणला होता. दरम्यान, या प्रकरणी रोहित पवारांना आता मानहानीची नोटीस पाठवण्यात आली. यावरून रोहित पवारांनी कोकाटेंवर जोरदार टीका केली.

शरद पवारांनी चावी दिली की, मनोज जरांगेंचं इंजिन टूक टूक करत’; ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची टीका 

पुराव्याशिवाय मी बोलत नाही. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? असा सवाल रोहित पवारांनी केला

रोहित पवारांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आणि सोबत मानहानीची नोटीस जोडली. त्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी म्हटलं की, माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आलीय. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? शेतकऱ्यांप्रती असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम सांगण्याची वेगळी गरज नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

पुढं त्यांनी लिहिलं की, तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीर आहे, नोटीस वाचून हसू आवरता आले नाही. पण लक्षात ठेवा, पुराव्याशिवाय मी बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट प्रुफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रुफ करेल, असं रोहित पवार म्हणाले.

Video : मुळात प्रत्येक जण बायसेक्शुअल…; अभिनेत्री स्वरा भास्कर नेमकं काय म्हणाली? 

follow us