कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा तो व्हिडिओ समोर; छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया काय?

Chhagan Bhujbal on Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे कायम वादग्रस्त वक्तव्य करतात. कायम वादाच्या भोवऱ्यात असतात. ते आता पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आलेत. विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यावरून विरोधकांनी त्यांची कोंडी केली आहे, या व्हिडीओवर आता मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मी तर काही अजून बघितलं नाही काय आहे ते? माणिकराव कोकाटे काय बघत होते? याबाबत मला काही माहिती नाही. मी सकाळपासून मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे मला काहीही माहीत नाही, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान विधानभवनाच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाला होता, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आपसात भिडले, प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं, यावर देखील भुजबळ यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे.
तो व्हिडिओ खोटाच, मी त्यांच्याच मागं बसलो होतो; मंत्री प्रताप सरनाई यांच्याकडून कोकाटेंची पाठराखण
मला 41 वर्षे होऊन गेलं, योग्य आहे असं कसं म्हणता येईल? 1985 मध्ये मी विधान भवनामध्ये आलो. विरोधी पक्षनेता झालो. 1991 ला महसूल मंत्री झालो. हाउसिंग मिनिस्टर झालो. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री झालो. त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेसचे बोलणारे लोक केशवराव धोंडगे, दिबा पाटील, दत्ता पाटील वेगवेगळे लोकं होते, इकडून सुद्धा मोहिते, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे, तर कधी छगन भुजबळ असाचे. एकमेकांच्या विरोधात जे काही मुद्दे असतील त्यावर भांडणं व्हायचे पण कोणाचं मण दुखायचं नाही असं भुजबळ म्हणाले.
त्याचबरोबर मी तर त्या दिवशी डोक्याला हात लावला, असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणावर प्रतिक्रिया देताना भाजपाशी चर्चा करू, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं. यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली होती. प्रश्न असा आहे की आज भाजप प्रणित सरकार बरोबर शिंदे शिवसेना गट आणि अजित पवार एनसीपी गट सध्या आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जेव्हा मोठे निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेला चर्चा होणं आवश्यक असतं, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.