तो व्हिडिओ खोटाच, मी त्यांच्याच मागं बसलो होतो; मंत्री प्रताप सरनाई यांच्याकडून कोकाटेंची पाठराखण

Pratap Sarnaik Supports Manikrao Kokate : महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Kokate) यांचा विधानसभेत बसून मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यावर विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया उटत आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्री कोकाटेंचे समर्थन केलं आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान, आमिर खान हे देखील रमी खेळतात. सध्या सगळेच रमी खेळतात. मंत्री सरनाईक यांची प्रतिक्रिया ही एक प्रकारे कृषीमंत्री कोकाटे यांचं समर्थन करणारी आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी मंत्री कोकाटे यांचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असल्याचं म्हटलं आहे.
ते सभागृहात बसून मोबाईलवर काही तरी पाहात असताना स्क्रोल करताना पत्ते त्यांच्यासमोर आले. मात्र, जो व्हिडिओ समोर आले आहे, तो चुकीचाच आहे, त्याचं समर्थन करणार नाही. पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांना योग्य समज देतील असंही सूरज चव्हाण म्हणाले. आमदार, मंत्री म्हणून आपण मर्यादा ठेवाव्यात. आपले वर्तनाने चुकीचा संदेश जाऊ नये. याविषयीची एथिकल कमिटी-नैतिक समिती निश्चितच भूमिका घेईल असंही ते म्हणाले.
तेव्हा मी कुणाला तरी; सभागृहातील रमीच्या व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, अजित पवार समज देणार?
हा प्रकार सभागृहात झाला आहे. हा व्हिडिओ मी पाहिलेला नाही. पण राज्यात आमदारांच्या चुकीच्या वर्तवणुकीवर नैतिक समिती निर्णय घेईल. सभागृहात अशा प्रकारची कोणतीही घटना होऊ नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री कोकाटेंच्या कृतीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, लोकशाहीच्या पवित्र मंदिरात सत्ताधारी आमदार काय करत आहेत, हे महाराष्ट्राने पाहिले आहे.
शेतकऱ्यांसंबंधी काहीही बोलले जात आहे. दुसरीकडे जंगली रमी खेळत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा यांनी खेळ मांडला आहे. तोच खेळ ते सभागृहात खेळत आहेत, अशी टीका आव्हाडांनी केली. राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पीकाला योग्य किंमत मिळत नाही. मराठवाडा, विदर्भात पावसाने ओढ दिली आहे यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, अशी राज्यातील परिस्थिती असताना राज्याचे कृषीमंत्री सभागृहत बसून ऑनलाईन पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ पाहून विरोधकाकंडून संताप व्यक्त होत आहे.