Rohit Pawar Claim Sujay Vikhe against BJP leaders : अहमदनगर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe ) यांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मायको कंट्रोलर तपासणीची मागणी केली होती. त्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, ईव्हीएमवर शंका घेत पराभवानंतर विखे भाजप नेत्यांच्या विरोधात जात आहेत. तशा चर्चा देखील सुरू आहेत. असंही पवार म्हणाले.
‘रोटरी प्रियदर्शिनी’च्या अध्यक्षपदी मिनल बोरा, मानद सचिवपदी स्वाती गुंदेचा
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, पराजय होईल असं विखेंना वाटलं नव्हतं. भाजपचे वरिष्ठ नेते म्हणतात की, ईव्हीएमवर शंका घेणे चुकीचे आहे. मात्र दुसरीकडे भाजपचेच उमेदवार असलेले सुजय विखे आपल्या पराभवानंतर निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मायको कंट्रोलर तपासणीची मागणी करतात. त्यामुळे ते एकप्रकारे भाजप नेत्यांच्या विरोधात जात आहेत. पराभवानंतर भाजपच्या विरोधात जातात की काय? तशा चर्चा देखील सध्य सुरू आहेत. असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
Sonu Sood : अभिनेत्याचा फ्रेंडशिपवरील हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकल प्रेक्षकांचं मन, म्हणाला…
दरम्यान ईव्हीएम मायको कंट्रोलर तपासणीच्या मागणीवर विखे म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मायको कंट्रोलर तपासणीची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आम्ही ही मागणी केली असल्याची माहिती त्यांनी शिर्डीमध्ये (Shirdi) आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली. तसेच ही मागणी केवळ आमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीनुसार करण्यात आली आहे असं देखील सुजय विखे यावेळी म्हणाले.
‘या’ कुटुंबाला पराभवच मान्य नाही, लंकेची सडकून टीका
विखेंकडून ईव्हीएम मायक्रो कंट्रोलर तपासणीची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आलीयं. त्यावर बोलताना खासदार लंके यांनी विखेंवर सडकून टीका केलीयं. या कुटुंबाला पराभवच मान्य नसल्याची टीका निलेश लंके यांनी केलीयं. निवडणूक प्रक्रिया मी पाहिली मात्र ही निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पडली. अधिक उशीरा निकाल हा नगर दक्षिण मतदारसंघाचा लागलेला आहे. याचाच अर्थ असा की, एक-एक पेपर त्या संबंधित अधिकाऱ्यांनी अनेकदा तपासले आहेत.
तर निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काम पाहिले, त्यांच्या खालोखाल उपजिल्हाधिकारी असून निवडणूक निर्णय अधिकारी असो तहसीलदार असो या सर्वांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली. समोरील उमेदवारांनी आरोप केला असेल तर वास्तविक पाहता राजकारणामध्ये पराभव मान्य करायला शिकले पाहिजे, असा खोचक टोला निलेश लंके यांनी लगावलायं.