‘रोटरी प्रियदर्शिनी’च्या अध्यक्षपदी मिनल बोरा, मानद सचिवपदी स्वाती गुंदेचा

‘रोटरी प्रियदर्शिनी’च्या अध्यक्षपदी मिनल बोरा, मानद सचिवपदी स्वाती गुंदेचा

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीने 2024-25 वर्षासाठी नवीन संचालक मंडळ नियुक्त केले आहे. संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी मिनल ईश्वर बोरा यांची तर मानद सचिवपदी स्वाती महेश गुंदेचा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या संस्थेची स्थापना सन 2002 मध्ये झाली. मागील 22 वर्षांपासून संस्था सामाजिक कार्यात आघाडीवर आहे. क्लबने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून प्रियदर्शिनी क्लबने लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.

नवीन संचालक मंडळात अध्यक्ष – मिनल ईश्वर बोरा, मानद सचिव – स्वाती महेश गुंदेचा, खजिनदार – प्रभा खंडेलवाल, सहसचिव – शुभा बोगावत, Ipp व क्लब इमेज, ग्लोबल ग्रांट – देविका रेले, क्लब प्रशासक – माधुरी सारडा, क्लब प्रशिक्षक – नीना मोरे, TRF – यास्मिन जलनवाला, मेंबरशिप डेव्हलपमेंट – प्रतिभा धूत, आंतरराष्ट्रीय सेवा – रिटा झंवर, RI व डिस्ट्रिक्ट एम्फसिस – अॅड. नीलमणी गांधी, सार्जेंट अॅट आर्म्स – ज्योती गांधी.

अहमदनगर जिल्हा दुष्काळमुक्त करणार! डॉ. सुजय विखेंना साथ द्या -फडणवीस

वैद्यकीय संचालक – डॉ. स्मिता तरडे, कम्युनिटी सर्व्हिस – सविता काळे, यूथ सर्व्हिस – आरती लोहाडे, व्होकेशनल सर्व्हिस – कुंदा हलबे, पर्यावरण सेवा – मंजू मुनोत, बुलेटिन संपादक – विभा तांबडे, लिटरेसी चेअर – गीता गिल्डा, WINS चेअर – डॉ. ममता डुंगरवाल, CSR – आशा फिरोदिया, IT सेवा – डॉ. स्वाती चंगेडिया, कल्चरल – सुरेखा मिनियार आणि सल्लागारपदी छाया फिरोदिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नूतन अध्यक्ष मिनल बोरा या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे माजी अध्यक्ष ईश्वर अशोक बोरा यांच्या पत्नी आहेत. ईश्वर बोरा यांनी त्यांच्या सचिवपदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात सर्वोत्तम सचिव पुरस्कार आणि अध्यक्षीय कार्यकाळात सर्वोत्तम अध्यक्ष पुरस्कार मिळवला आहे. त्यांच्या आणि प्रियदर्शिनी क्लबच्या सर्व माजी अध्यक्षांचे मार्गदर्शनाची मिनल बोरा यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात निश्चितच मदत होईल. सर्वांच्या सहकार्याने प्रियदर्शिनीच्या माध्यमातून आगामी काळात जास्तीत जास्त समाजकार्य करण्याचा मानस मिनल बोरा यांनी व्यक्त केला. आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे अनेक उपक्रम हाती घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संचालक मंडळ रोटरी क्लबच्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शहरात सेवा देण्यास तत्पर आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल डॉ. सुरेश साबू, जिल्हा सचिव डॉ. नितीन खंडेलवाल यांच्यासह क्लबच्या सर्व सदस्यांनी नवीन अध्यक्ष आणि संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

देशाला दाखवून देऊ अहमदनगर जिल्हा मोदींच्या पाठीशी आहे -संग्राम जगताप

follow us
  • fb
  • instagram
  • youtube